जानेफळ (हॅलो बुलढाणा/अनिल राठोड) हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त ईद-ए-मिलादुन्नबीचा पवित्र उत्सव केवळ मिरवणुकीपुरता मर्यादित न ठेवता, जानेफळच्या युवकांनी रक्तदानातून माणुसकीचा जागर घडविला. एकता ग्रुपच्या वतीने बुधवार, दि. २६ ऑगस्ट रोजी घुटी वेस परिसरात आयोजित भव्य रक्तदान शिबिरात तब्बल ८९ युवकांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले.
शिबिराच्या प्रारंभी ठाणेदार शरद माळी, सामाजिक कार्यकर्ते मोहनराव धोटे, डॉ. कृष्णा हावरे, सरपंचपती गजानन वडणकर, शिवसेना नेते विश्वासराव सवडतकर, माजी सरपंच किशोर गव्हाड, उपसरपंच विजय कृपाळ यांच्यासह मान्यवरांचा एकता ग्रुपकडून सत्कार करण्यात आला.
“रक्तदान हेच श्रेष्ठ दान,” असे ठाणेदार शरद माळी यांनी सांगितले. तर, “जानेफळात हिंदू-मुस्लिम समाज भावाभावाप्रमाणे राहतो,” असे विश्वासराव सवडतकर यांनी स्पष्ट केले.
डॉ. कृष्णा हावरे यांनी प्रास्ताविकात, “रक्ताला जात किंवा धर्म नसतो; गरजूचा जीव वाचविणे हाच रक्तदानाचा खरा धर्म आहे,” असा प्रभावी संदेश दिला. सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत चाललेल्या शिबिरासाठी एकता ग्रुपने अथक परिश्रम घेत रक्तदात्यांसाठी चहा व फराळाची व्यवस्था केली.











Total Users : 3350148