spot_img
spot_img

‘इबादत में कुव्वत!’ चक्क बारा वर्षाच्या मुलाला संपूर्ण कुरआन मुखोद्गत! मोमीन खुजैमा याच्या विशेष कामगिरीचा गौरव!

धामणगाव बढे, (हॅलो बुलढाणा/एस. बि शेख) मदरसा दारुल उलूम युसुफिया येथे बुधवार, २६ ऑगस्ट २०२६ रोजी खतम-ए-कुरआन मजलिसचे आयोजन करण्यात आले. यावेळी अल्लाहच्या कृपेने मदरशातील तब्बल १० विद्यार्थ्यांनी पवित्र कुरआन मुखोद्गत करून ‘हाफिज-ए-कुरआन’ होण्याचा सन्मान प्राप्त केला. यामध्ये अवघ्या १२ वर्षांच्या मोमीन खुजैमा मो. शाहिद या विद्यार्थ्याने विशेष उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

सहावी इयत्तेत शिक्षण घेत असलेल्या खुजैमा याने मदरसा दारुल उलूम युसुफिया येथे हाफिज युनुस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण पवित्र कुरआन मुखोद्गत केले. यापूर्वी खुजैमा याने मदरसा अंजुमन इत्तेहाद-ए-मुस्लिमीन, रोहिणखेड, ता. मोताळा, जि. बुलढाणा येथे हाफिज तौसीफ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कुरआनचे १३ पारे मुखोद्गत केले होते. त्यानंतर पुढील शिक्षण व मार्गदर्शनातून त्याने संपूर्ण कुरआन मुखोद्गत करण्याचे ध्येय पूर्ण केले. अल्पवयातच धार्मिक शिक्षणासोबतच एवढी मोठी कामगिरी केल्याबद्दल मोमीन खुजैमा याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. त्याच्या या यशामागे त्याचे शिक्षक, पालक आणि मदरशातील मार्गदर्शकांचे मोलाचे योगदान असल्याचे सांगण्यात आले. खतम-ए-कुरआन मजलिसीच्या निमित्ताने सर्व हाफिज विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!