spot_img
spot_img

भक्तीला मिळणार ‘भव्य निवारा’! श्रीक्षेत्र सोनाळ्यात भक्त निवासाचे भूमिपूजन; धार्मिक पर्यटनाच्या नकाशावर झळकणार संतभूमी!

सोनाळा (हॅलो बुलढाणा/ज्ञानदेव राजनकर) श्रीसंत सोनाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या श्रीक्षेत्र सोनाळ्याच्या विकासाला आता नवे बळ मिळणार आहे. भाविकांसाठी उभारण्यात येणाऱ्या भव्य भक्त निवासाचे भूमिपूजन गुरुवार, दि. २० ऑगस्ट २०२६ रोजी माजी मंत्री तथा आमदार डॉ. संजय कुटे यांच्या हस्ते भक्तिमय वातावरणात करण्यात आले.

भूमिपूजनापूर्वी डॉ. कुटे यांनी श्रीसंत सोनाजी महाराजांच्या स्मृतीचे दर्शन घेत आशीर्वाद घेतले. संतपरंपरेचा वारसा जपणाऱ्या श्रीक्षेत्र सोनाळ्याला धार्मिक आणि पर्यटनदृष्ट्या व्यापक ओळख मिळावी, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

संग्रामपूर तालुक्यातील श्रीक्षेत्र सोनाळा येथे दरवर्षी राज्यासह विविध भागांतून मोठ्या संख्येने भाविक दाखल होतात. मात्र, बाहेरगावाहून येणाऱ्या भाविकांसाठी सुरक्षित आणि सुविधायुक्त निवासाची पुरेशी व्यवस्था नसल्याने त्यांची गैरसोय होत होती. नव्याने उभारण्यात येणारा भक्त निवास ही अडचण दूर करून भाविकांसाठी मोठा आधार ठरणार आहे.

या प्रकल्पामुळे केवळ निवासाची सुविधा निर्माण होणार नसून, सोनाळ्याच्या धार्मिक पर्यटनालाही मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे. भाविकांची संख्या वाढल्यास परिसरातील रस्ते, स्वच्छता, पाणीपुरवठा, वाहतूक आणि स्थानिक व्यवसायांच्या विकासालाही गती मिळू शकते.

संतपरंपरेचा जयघोष आणि भाविकांच्या उत्स्फूर्त उपस्थितीने भूमिपूजन सोहळा संस्मरणीय ठरला. भक्त निवासाचे काम वेळेत आणि दर्जेदार पूर्ण झाल्यास श्रीक्षेत्र सोनाळा धार्मिक पर्यटनाच्या नकाशावर अधिक ठळकपणे झळकणार असून, संतभूमीच्या सर्वांगीण विकासाचे नवे पर्व सुरू होणार आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!