spot_img
spot_img

EXCLUSIVE! लोणारच्या अथर्वची थेट रशियात भरारी; अडीच हजार विद्यार्थ्यांमधून निवड, मॉस्को विद्यापीठात शिष्यवृत्तीसह शिकणार ‘सायबर सिक्युरिटी’!

लोणार (हॅलो बुलढाणा/राहुल सरदार) लोणारच्या शैक्षणिक शिरपेचात मानाचा तुरा रोवणारी अभिमानास्पद बातमी समोर आली आहे. येथील प्रतिष्ठित डॉ. भास्कर मापारी आणि वैद्यकीय अधिकारी डॉ. कविता मापारी यांचा सुपुत्र अथर्व मापारी याची रशियातील आघाडीच्या मॉस्को स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये अभियांत्रिकीच्या पुढील शिक्षणासाठी शिष्यवृत्तीसह निवड झाली आहे.

अथर्व सध्या पंजाबमधील एलपीयू विद्यापीठात बी.टेक.च्या सायबर सिक्युरिटी विषयात विशेष शिक्षण घेत आहे. विद्यापीठात मॉस्को स्टेट युनिव्हर्सिटीतर्फे आयोजित कॅम्पस मुलाखत आणि निवड प्रक्रियेत त्याने आपल्या ज्ञानाची जबरदस्त छाप पाडली. तब्बल अडीच हजार विद्यार्थ्यांमधून त्याची निवड करण्यात आली असून, बी.टेक.च्या तृतीय वर्षातील पुढील शिक्षणासाठी त्याला रशियातील मुख्य विद्यापीठाने शिष्यवृत्तीसह आमंत्रित केले आहे.

लोणारसारख्या ग्रामीण भागातून थेट आंतरराष्ट्रीय शिक्षणाच्या व्यासपीठावर झेप घेणाऱ्या अथर्वचे हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरले आहे. त्याला नुकताच रशियन फेडरेशनचा व्हिसाही प्राप्त झाला असून, येत्या २३ ऑगस्ट रोजी तो रशियासाठी रवाना होणार आहे.

आपल्या यशाचे श्रेय अथर्वने आई-वडील आणि गुरुजनांना दिले आहे. त्याच्या या ऐतिहासिक यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!