देऊळगाव राजा (संतोष जाधव/हॅलो बुलढाणा) आमदार श्वेता ताई महाले यांच्या नेतृत्वात देऊळगाव राजा तालुक्यात शकडो युवकांनी भाजपात प्रवेश केला. सिंदखेड राजा मतदार संघात मागील गेल्या अनेक दशकापासून भारतीय जनता पार्टीला सत्तेचा पाया रोवता न आल्यामुळे सिंदखेड राजा व देऊळगाव राजा या दोन्ही तालुक्यात भाजपाला मरगळ आल्याचे चित्र सध्यास्थित दिसून येत आहे. परंतु भाजपा युवानेते गणेश नागरे यांनी देऊळगाव राजा तालुक्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विचारधारा व भाजप पक्षाचे ध्येय -धोरण सर्व समाजघटका पर्यंत पोहचविण्याचे कार्य सुरू केले आहे.
10 ऑगस्ट रोजी सोमवारला स्थानिक सुरुची हॉटेलच्या भव्य- दिव्य प्रागणात आमदार श्वेताताई महाले व जिल्हा अध्यक्ष तथा माजी आमदार विजयराज शिंदे यांच्या नेतृत्वात देऊळगाव राजा तालुक्यातील असंख्य गावातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य त्याचबरोबर शेकडो युवकांचा भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश सोहळा घेण्यात आला.यावेळी इंजिनियर भारतीताई इंगळे,बायगांव खुर्द सरपंच प्रतीक्षाताई नागरे,गणेश हांडे,सुरा सरपंच सिद्धेस्वर चेके,सावखेड नागरे सरपंच संजय मोरे, शिवणी आरामाळ अनिल सोनपसारे, सावखेड भोई उपसरपंच वसंत वाघमारे,ग्रामपंचायत सदस्य संतोष टेकाळे,मल्हारी चवरे,प्रल्हाद ढोले,गणेश खोबरे, गंगाधर इंगळे, रमेश चेके,सुभाष डोंगरे यांच्या समर्थकासह ग्रामीण भागतील असंख्य युवकांनी भाजपात जाहीर प्रवेश घेतला. याप्रसंगी चिखली मतदार संघाच्या आमदार श्वेताताई महाले, भाजपा जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे,युवक जिल्हा अध्यक्ष संतोष काळे, माजी खासदार सुखदेव काळे, माजी आमदार तोतारामजी कायंदे, माजी जिल्हाध्यक्ष डॉ. गणेश मांटे, ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुनील कायंदे, माजी जिल्हा परिषद सदस्य भगवान मुंढे,जिल्हा सरचिटणीस राम मुंढे, जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत बरदे, ज्येष्ठ नेते सुभाषराव घिके, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सविताताई पाटील, देऊळगाव राजा नगरपरिषद उपाध्यक्ष सौ. वनिताताई भुतडा यांच्यासह अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
देऊळगाव राजा तालुक्यात भाजपाला मिळत असलेला वाढता जनसमर्थनाचा प्रतिसाद हा पक्षाच्या विकासाभिमुख विचारांवरील जनतेच्या विश्वासाची पावती आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या वाढत्या संघटन बळाचा निश्चितच येणाऱ्या काळात भाजप पक्षाला फायदा होईल.










Total Users : 3283830