खामगाव (हॅलो बुलढाणा) खामगाव परिसरात इंडियन ऑइलच्या टँकरमधून गॅस चोरीचा कथित गोरखधंदा सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार राज्य दक्षता पथकाच्या अचानक छाप्यात उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने टँकरमधील गॅस काढून त्याची अवैध विक्री केली जात असल्याचा प्राथमिक संशय व्यक्त होत आहे.
दक्षता पथकाने घटनास्थळी धडक देत एका संशयिताला ताब्यात घेतल्याची माहिती असून, या प्रकरणातील कथित मुख्य सूत्रधार मात्र कारवाईची चाहूल लागताच फरार झाल्याची चर्चा आहे. या गॅस चोरीच्या प्रकाराकडे स्थानिक अधिकारी आणि संबंधित यंत्रणांचे इतके दिवस दुर्लक्ष कसे झाले, असा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे.
या अवैध व्यवसायाला नेमका कोणाचा आशीर्वाद होता? स्थानिक प्रशासनाला माहिती नव्हती की जाणीवपूर्वक डोळेझाक करण्यात आली? आता तपासात आणखी किती मोठी नावे समोर येतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.










Total Users : 2723080