बुलढाणा (हॅलो बुलढाणा) भाईजींची बुलढाणा अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी ही भारतातील आणि आशिया खंडातील अग्रगण्य नागरी सहकारी पतसंस्थांपैकी एक आहे. १५ ऑगस्ट १९८६ रोजी केवळ १२,००० रुपये भांडवल आणि ७२ सदस्यांसह सुरू झालेली ही संस्था आज यशाच्या शिखरावर पोहोचली आहे. नुकतीच ४,५०० सभासदांच्या उपस्थितीत वार्षिक सर्वसाधारण सभा 2026 उत्साहात पार पडली. यावेळी हजारो कोटी रुपयांच्या ठेवी आणि लाखो सभासदांचा अतूट विश्वास हीच आमची खरी ताकद, असे भाईजी यांनी म्हणत सभासदांना प्रोत्साहित केले.
बुलढाणा अर्बन बँकेचे भारत भरातील ४ राज्यांमध्ये मिळून ४८६ पेक्षा जास्त शाखा आणि ४६० हून अधिक वेअरहाऊस (गोदामे) कार्यरत आहेत.
या संस्थेशी १७ लाखांहून अधिक खातेदार आणि सदस्य जोडलेले आहेत.संस्थापक अध्यक्ष: श्री. राधेश्यामजी (भाईजी) चांडक यांच्या दूरदृष्टी आणि प्रामाणिक प्रयत्नांमुळे या संस्थेचा पाया रचला गेला.केवळ बँकिंग क्षेत्रातच नव्हे, तर सामाजिक जबाबदारी म्हणून बुलढाणा अर्बनने अनेक ठिकाणी ‘भक्ती निवास’ सुरू केले आहेत, जिथे भाविकांना राहण्याची उत्तम सोय मिळते.
अयोध्या भक्ती निवास, तिरुपति भक्ती निवास,
शिर्डी भक्ती निवास, माहूर आणि ओंकारेश्वर भक्ती निवास आदी भक्ती निवासामुळे बुलढाणा अर्बन बँक प्रचलित आहे. दरम्यान
बुलडाणा अर्बनची वार्षिक सर्वसाधारण सभा 2026 उत्साहात पार पडली. सभेला तब्बल ४,५०० सभासदांची उपस्थिती होती.
‘विश्वास, सहभाग आणि सहकाराची ही भव्य एकजूट यावेळी दिसून आली. ‘हजारो करोडो रुपयांच्या ठेवी आणि लाखो सभासदांचा अटूट विश्वास हीच आमची खरी ताकद असल्याचे भाईजी म्हणाले. राधेश्यामजी चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली तरुण, उच्चशिक्षित व विचारी अध्यक्ष डॉ.सुकेश झंवर यांच्या सक्षम नेतृत्वाखाली संस्था यशाची नवनवीन शिखरे पादाक्रांत करत आहे.











Total Users : 3525305