चिखली (हॅलो बुलढाणा/ सय्यद साहिल) शहरातील एका नामांकित शाळेच्या परिसरात महिला शिक्षिकेचा पाठलाग करून तिच्याशी बोलण्याचा हट्ट धरत मोबाइल क्रमांक मागितल्याचा प्रकार बुधवारी सकाळी घडला. या घटनेमुळे शिक्षक कॉलनीसह शहरात चांगलीच खळबळ उडाली आहे.
पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, ३८ वर्षीय नोकरदार महिला बुधवारी सकाळी ८.४५ ते ८.५० वाजेदरम्यान चिखली अर्बन विद्यानिकेत शाळेच्या परिसरात होती. त्यावेळी आरोपी अकील अहमद अब्दुल अहमद, रा. चिखली, याने संबंधित महिलेचा पाठलाग केल्याचा आरोप आहे.
“तुम्ही मला खूप आवडता, मला तुमच्याशी बोलायचे आहे,” असे म्हणत आरोपीने महिलेचा मोबाइल क्रमांक मागितल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे महिला घाबरली. तिने थेट चिखली पोलिसांत धाव घेत तक्रार नोंदविली.
महिलेच्या तक्रारीवरून चिखली पोलिसांनी अपघात क्रमांक ६४३/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहितेच्या कलम ७८ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल कैलास चतरकर करीत आहेत.
घटनास्थळी पोलीस निरीक्षक भूषण गावंडे व पोलीस उपनिरीक्षक सुधन सुसर यांनी भेट देऊन परिस्थितीची माहिती घेतली















Total Users : 3299823