spot_img
spot_img

शेगावात बालकामगारांच्या हातात अवजारं! कृतीदलाची धाड; गॅरेज-वेल्डिंग वर्क्समधून तिघांची सुटका, मालकांवर गुन्हे!

शेगाव (हॅलो बुलढाणा) शिक्षण घेण्याच्या आणि भविष्य घडविण्याच्या वयात चिमुकल्या हातांमध्ये अवजारं देऊन राबवून घेणाऱ्यांविरोधात प्रशासनाने शेगावात जोरदार कारवाई केली आहे. जिल्हाधिकारी यांच्या नियंत्रणाखालील कृतीदलाने दोन आस्थापनांवर अचानक धाड टाकत तीन बाल व किशोरवयीन कामगारांची मुक्तता केली. संबंधित आस्थापनाधारकांविरुद्ध शेगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

२८ जुलै रोजी राबविण्यात आलेल्या विशेष धाडसत्रात खामगाव रोडवरील इंडियन मोटर गॅरेजमध्ये एक बालकामगार काम करताना आढळला. तर महाराष्ट्र स्प्रिंग पार्ट अँड वेल्डिंग वर्क्समध्ये दोन किशोरवयीन कामगारांकडून काम करून घेतले जात असल्याचे उघड झाले. कृतीदलाने तिन्ही मुलांची तातडीने सुटका केली.

बाल व किशोरवयीन कामगारांना बेकायदेशीररीत्या कामावर ठेवणे हा गंभीर आणि दंडनीय गुन्हा असून, अधिनियमाच्या कलम १४ नुसार दोषींवर कठोर दंडात्मक कारवाई होऊ शकते. ही कारवाई कामगार अधिकारी शैलेश देशमुख यांच्या नेतृत्वात करण्यात आली. महिला व बालविकास विभाग, दुकाने निरीक्षक आणि शेगाव पोलिसांनी मोहिमेत सहभाग घेतला.

दरम्यान, “बालकांच्या भवितव्याशी खेळणाऱ्यांची माहिती लपवू नका; तातडीने प्रशासनाला कळवा,” असे आवाहन कामगार विभागाने केले आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!