spot_img
spot_img

पहाटे साडेपाचलाच पोलिसांचा ‘हल्लाबोल’! मोहना बु.च्या नदीकाठचे हातभट्टी अड्डे उद्ध्वस्त; नवनियुक्त ठाणेदार शरद माळींच्या धडाक्याने दारूविक्रेत्यांचे धाबे दणाणले!

जानेफळ (हॅलो बुलढाणा/अनिल राठोड) नवनियुक्त ठाणेदार शरद माळी यांनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने बुधवारी पहाटे साडेपाच वाजताच मोहना बु. या दुर्गम भागात अचानक धाड टाकत हातभट्टी दारूच्या अड्ड्यांवर अक्षरशः बुलडोझर फिरविला.

पोलिसांच्या अचानक एन्ट्रीमुळे अवैध गावठी दारू विक्रेत्यांची चांगलीच तारांबळ उडाली. पथकाने संशयितांच्या घरांची झाडाझडती घेतली. त्यानंतर नदीकाठालगत छुप्या पद्धतीने सुरू असलेले हातभट्टी दारूचे अड्डे शोधून पूर्णपणे उद्ध्वस्त केले.

या धाडीत लपवून ठेवलेली अंदाजे २५ ते ३० हजार रुपये किमतीची गावठी दारू जप्त करण्यात आली. गावातील महिला पंचांच्या उपस्थितीत हा साठा जागच्या जागी नष्ट करण्यात आला. संबंधितांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

ही कारवाई हेड कॉन्स्टेबल काकड, पवार, कॉन्स्टेबल पाटोळे, महिला कॉन्स्टेबल निता पवार व चालक येमले यांनी केली. अनेक वर्षांनंतर झालेल्या या मोठ्या कारवाईमुळे महिलांनी समाधान व्यक्त केले असून, अवैध धंदे करणाऱ्यांना पोलिसांनी आता स्पष्ट इशाराच दिला आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!