spot_img
spot_img

CRIME NEWS! ट्युशनहून घरी निघाली दोन चिमुकली भावंडं… वाटेत अंधारात दबा धरून बसले होते ‘ते’ दोघे! गळा दाबला, ‘आरडाल तर जिवंत सोडणार नाही’ची धमकी अन् १६ हजार हिसकावले; रात्री मुलांना एकटं पाठवण्याआधी मलकापूरची ही बातमी नक्की वाचा!

मलकापूर (हॅलो बुलढाणा) ट्युशनची फी भरण्यासाठी वडिलांनी मुलाच्या हातात दिलेले तब्बल १६ हजार रुपये घेऊन दोन अल्पवयीन भाऊ घराकडे पायी निघाले… मात्र वाटेत दबा धरून बसलेल्या दोघांनी त्यांना अडवून रस्त्याच्या कडेला अंधारात नेले, एका मुलाचा गळा दाबून जीवे मारण्याची धमकी दिली आणि दुसऱ्या मुलाच्या जीन्सच्या खिशातील १६ हजार रुपये जबरदस्तीने हिसकावल्याची धक्कादायक घटना मलकापूर शहरात घडल्याने खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी सैयद अलीयार सैयद सुलतान (वय ३८, रा. अहमदशाहपुरा, पारपेठ, मलकापूर) यांनी मलकापूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादीनुसार, १६ जुलै रोजी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास त्यांची दोन मुले सैयद अदनान आणि सैयद जीशान ट्युशनवरून घरी परतत होती. तत्पूर्वी वडिलांनी जीशानकडे ट्युशन फी भरण्यासाठी १६ हजार रुपये दिले होते.

अहमदशाहपुरा येथील अहमदिया मशिदीजवळ दोन व्यक्तींनी मुलांना अडवून अंधाराच्या ठिकाणी नेल्याचा आरोप आहे. त्यापैकी एकाने अदनानचा गळा दाबून जीवे मारण्याची धमकी दिली, तर दुसऱ्याने जीशानच्या खिशातील रोकड हिसकावली. मुलांनी आरडाओरड केल्यानंतर परिसरातील नागरिक धावून आल्याने आरोपींनी त्यांच्याशीही झटापट करून पळ काढल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

या प्रकरणी पोलिसांनी शेख हफीज शेख रशीद उर्फ जाधव आणि रेहान शेख बुढन उर्फ रिजवान बिल्डर यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १२६(२), ३(५), ३०९(४) आणि ३५१(२) अंतर्गत गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.

ट्युशनच्या फीवरच लुटारूंचा डोळा होता का? अल्पवयीन मुलांना अंधारात नेण्यामागे नेमका काय डाव होता? या घटनेने मलकापूर शहरातील पालकांमध्ये मात्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!