spot_img
spot_img

डेंग्यूला शेंबातून थेट इशारा! १८० विद्यार्थ्यांनी घेतली डासमुक्त गावाची शपथ; ‘ड्राय डे’ पाळण्याचे आरोग्य विभागाचे आवाहन

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) डेंग्यू आणि हिवतापाचा वाढता धोका रोखण्यासाठी आरोग्य विभागाने आता थेट विद्यार्थ्यांमध्ये जनजागृतीची मोहीम उभी केली आहे. राज्य शासनाच्या ‘माझे गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियानांतर्गत तसेच ‘डेंग्यू प्रतिबंध महिना २०२६’ निमित्त कृषी विद्यालय, शेंबा येथे डेंग्यू व हिवताप प्रतिबंध जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रणजीत मंडाले यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित कार्यक्रमात तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अजय रिंढे यांनी वैयक्तिक स्वच्छता, परिसर स्वच्छता आणि डासांची पैदास रोखण्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले.

कीटकशास्त्रज्ञ मयूर शिरसाठ यांनी एडिस डासांची ओळख, डेंग्यू व हिवतापाचा प्रसार, पाणी साचण्याची ठिकाणे आणि प्रतिबंधात्मक उपायांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. आठवड्यातून एक दिवस ‘ड्राय डे’ पाळा, पाण्याची भांडी झाकून ठेवा, घराभोवती पाणी साचू देऊ नका आणि ताप आल्यास तातडीने शासकीय रुग्णालयात तपासणी करा, असा स्पष्ट संदेश देण्यात आला.

या कार्यक्रमात सुमारे १८० विद्यार्थी व शिक्षक सहभागी झाले. कार्यक्रमाच्या अखेरीस सर्वांनी डेंग्यू प्रतिबंधाची शपथ घेत शेंबा परिसर डासमुक्त करण्याचा निर्धार केला.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!