spot_img
spot_img

BREAKING बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर 100 कोटींचा अब्रूनुकसानीचा बॉम्ब! भाजप जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदेंची सुप्रसिद्ध वकील असीम सरोदे यांच्यामार्फत नोटीस; बुलढाण्यात भाजप-शिवसेना वाद पुन्हा पेटणार?

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) बुलढाण्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप घडवणारी घडामोड समोर आली आहे. शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी माध्यमांसमोर भाजप जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार विजयराज शिंदे यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांनंतर आता विजयराज शिंदे यांनी थेट कायदेशीर पाऊल उचलले आहे. शिंदे यांनी प्रसिद्ध वकील असीम सरोदे यांच्यामार्फत आमदार संजय गायकवाड यांना तब्बल 100 कोटी रुपयांच्या अब्रूनुकसानीची नोटीस पाठवल्याने बुलढाण्यातील राजकीय वातावरण तापले आहे.

आमदार संजय गायकवाड यांनी माध्यमांसमोर विजयराज शिंदे यांच्यावर त्यांच्या शाळेतील आदिवासी मुलींच्या लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केल्याचा दावा शिंदे गटाकडून करण्यात येत आहे. हे आरोप खोटे, बदनामीकारक आणि राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे सांगत विजयराज शिंदे यांनी यापूर्वी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तसेच गायकवाड यांच्यावर पोक्सो, विनयभंग, बदनामी आणि अ‍ॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणीही करण्यात आली होती.

मात्र तक्रारीवर अपेक्षित कारवाई न झाल्याचा आरोप करत आता शिंदे यांनी कायदेशीर लढाई अधिक तीव्र केली आहे. वकील असीम सरोदे यांच्यामार्फत संजय गायकवाड यांना अब्रूनुकसानीची नोटीस पाठविण्यासोबतच जिल्हा पोलीस अधीक्षकांनाही अधिकृत नोटीस देण्यात आली आहे. या नोटीसमध्ये तक्रारीची दखल घेऊन संबंधित कलमान्वये गुन्हे दाखल करून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

या प्रकरणामुळे बुलढाण्यात भाजप आणि शिवसेनेतील जुना राजकीय संघर्ष पुन्हा एकदा विकोपाला जाण्याची चिन्हे दिसत आहेत. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींनी आधीच तापलेल्या बुलढाण्याच्या राजकारणात आता 100 कोटींच्या नोटीसमुळे नवा स्फोट झाला आहे. आता या कायदेशीर आणि राजकीय घमासानावर आमदार संजय गायकवाड काय भूमिका घेतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!