जळगाव जामोद (हॅलो बुलडाणा/ज्ञानदेव राजनकर) तालुक्यातील मुदत संपलेल्या एकूण 26 ग्रामपंचायतीच्या निवडणूक घेण्यासाठी हालचालीन वेग आला असून येत्या 10 जून व 11 जून रोजी ग्रामपंचायत मध्ये विशेष सभा घेऊन सदस्यांचा आरक्षण सोडतीचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे.जळगाव जामोद तालुक्यासह राज्यामध्ये एकूण पंधरा हजार ग्रामपंचायतीच्या निवडणुकींसाठी हालचालींना वेग आला असून जळगाव जामोद तालुक्यातील एकूण 26 ग्रामपंचायतीमध्ये प्रभाग रचनेचा कार्यक्रम संपन्न झाला असून माननीय राज्य निवडणूक आयोगाचे दिनांक 26/5/2026 रोजीचे आदेशान्वये आरक्षण सोडतीचा कार्यक्रम संबंधित ग्रामपंचायतचे सूचना फलकवर दिनांक 6/6/2026 व दिनांक 7/6/2026 रोजी प्रसिद्ध करवायचे आहे
यामध्ये जळगाव जामोद तालुक्यातील एकूण 26 ग्रामपंचायतींचा समावेश आहे त्यामध्ये आडोळ बु, सुनगांव,दादुलगांव, कुरणगाड खुर्द, रसुलपूर, वायड (निमखेडी),प्रिंप्री खोद्री,धानोरा, वडशिंगी, काजेगांव,आसलगांव चावरा ,कुरणगाड बु ग्रामपंचायतच्या सदस्यांचा आरक्षण दिनांक
10/06/2026 विशेष ग्रामसभेचा आयोजन करून निघणार आहे तर वडगांव गड , सावरगांव,चालठाणा खुर्द, सुलज,अकोला खुर्द, पळशी सुपो,गाडेगांव खुर्द, खांडवी,पिंपळगांव काळे, मानेगांव, भेंडवळ बु, खेर्डा बु ,उमापूर. दिनांक 11/06/2026 रोजी अध्याशी अधिकारी यांच्या समक्ष सदस्यांचं आरक्षण सोडतिला संबंधित ग्रामपंचायत गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार पवन पाटील व निवडणूक अधिकारी नायब तहसीलदार किटे यांच्यासह निवडणूक लिपिक सत्यविजय जाधव यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे.










