बुलढाणा (हॅलो बुलडाणा) जिल्हा काँग्रेसच्या खात्यातील कथित 50 लाख रुपयांच्या गोंधळावरून आता जिल्ह्या काँग्रेसमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाषणात हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर, कार्यकर्त्यांचे 50 लाख रुपये खाणारा तो तत्कालीन जिल्हाध्यक्ष कोण? असा थेट सवाल राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.
यावर बोलताना माजी जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी सूचक प्रतिक्रिया दिली. बोंद्रे म्हणाले की, मी जिल्हाध्यक्ष झालो तेव्हा खात्यात पैसे नव्हते. माझ्या आधीच्या कार्यकाळात जमा केलेले पैसे कुठे गेले, याचा शोध प्रदेश काँग्रेस घेत आहे. आज मी पद सोडताना पुन्हा जवळपास 40 लाख रुपये काँग्रेसच्या खात्यात जमा आहेत.
बोंद्रे यांच्या मते, हा संपूर्ण प्रकार त्यांच्या आधीच्या जिल्हाध्यक्षांच्या कार्यकाळातील आहे. मात्र त्यांनी ‘ते आता सत्ताधारी पक्षात आहेत…’ असे सूचक वक्तव्य केल्याने संशयाची सुई थेट सत्ताधारी पक्षात गेलेल्या माजी काँग्रेस नेत्यांकडे वळली आहे.
आता बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटी या कथित 50 लाखांच्या प्रकरणाचा शोध घेत आहे. मात्र कार्यकर्त्यांचे पैसे खाणारा तो तत्कालीन जिल्हाध्यक्ष नेमका कोण? याचा शोध लावणे गरजेचे आहे










