spot_img
spot_img

EXCLUSIVE भोंदू खरातचा बुलढाणा कनेक्शन?‘समता’ घोटाळ्यातून कोट्यवधींचा खेळ उघड; तपास यंत्रणांच्या रडारवर जिल्ह्यातील काही चेहरे; मलकापूर अर्बनवर आरोप करणारेच आता अडचणीत?

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) देशात चर्चेत असलेले भोंदू खरात प्रकरण नाशिक-शिर्डी परिसरात उघडकीस आलेल्या बहुचर्चित ‘समता’ पतसंस्था घोटाळ्याने आता थेट बुलढाणा जिल्ह्यापर्यंत धडक दिल्याची जोरदार माहिती सूत्रांकडून मिळत आहे. स्वतःला अध्यात्मिक चेहरा देत आर्थिक साम्राज्य उभं करणारा भामटा भोंदू अशोक खरात सध्या न्यायालयीन कोठडीत असून, त्याच्या चौकशीतून रोज नवे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. ईडीची कोठडी संपल्यानंतर न्यायालयाने त्याला ९ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मात्र, या प्रकरणात शिर्डी पोलिसांनी आता खरातला ताब्यात घेण्यासाठी हालचाली वेगाने सुरू केल्याने अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला आहे.

विशेष म्हणजे ‘समता सह इतर’ पतसंस्थेतील शेकडो संशयास्पद खात्यांचा तपास सुरू असताना, अनेक खात्यांमधून कोट्यवधींचे व्यवहार झाल्याचे समोर येत आहे. चौकशीत खरातने राहाता शाखेच्या व्यवस्थापकाच्या सांगण्यावरून बोगस खाती उघडल्याची कबुली दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या रॅकेटचे धागेदोरे आणखी किती पतसंस्था? आणि संचालकांपर्यंत पोहोचणार,याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणामुळे बुलढाणा जिल्ह्यातील सहकार पतसंस्था विश्वातही मोठी खळबळ उडाली आहे. कारण काही महिन्यांपूर्वी राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांनी बुलढाण्यात पत्रकार परिषद घेत भाजप नेते तथा मलकापूर आमदार चैनसुख संचेती मलकापूर अर्बनशी संबंधित नेतृत्वावर गंभीर आरोप करत वैयक्तिक चौकशीची मागणी केली होती. बुडीत “मलकापूर अर्बनची कलम ८८ अंतर्गत चौकशी करा,” अशी आक्रमक भूमिका घेणारे तेच काका कोयटे आता स्वतःच संशयाच्या भोवऱ्यात अडकले असल्याची चित्र रंगली आहे.

‘स्वतःचं झाकायचं आणि दुसऱ्याचं वाकडं काढायचं’ अशीच अवस्था आता ‘समता’ पतसंस्थेची झाल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांतून उमटत आहे. भोंदू खरातला साथ देणाऱ्या प्रत्येकावर कठोर कारवाई झाली पाहिजे,अशी मागणी जोर धरू लागली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील काही पतसंस्थांचा या नेटवर्कशी ‘चुलत भावासारखा’ संबंध असल्याची खमंग चर्चा आधीपासून सुरू होती.आता तपास यंत्रणांच्या रडारवर बुलढाण्यातील काही पांढऱ्या पोशाखातील व काही शासकीय अधिकारी आर्थिक चेहरे आल्याची दबकी चर्चा जोर धरू लागली आहे.

दरम्यान, सहकार विभागाने ‘समता’ पतसंस्थेच्या व्यवहारांचा अहवाल १५ दिवसांत सादर करण्याचे आदेश दिले होते. मात्र दीड महिना उलटूनही अहवाल गुलदस्त्यातच असल्याने संशय अधिक गडद झाला आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!