spot_img
spot_img

CRIME NEWS! मध्यरात्री घरात शिरले ‘ते’… झोपलेल्या अख्ख्या कुटुंबाला बाहेरून केले बंद! पहाटे शेजाऱ्यांनी कडी उघडताच बेडरूममध्ये दिसले भयावह दृश्य; पहुरजिऱ्यातील ‘त्या’ चार तासांचे गूढ काय?

शेगाव (हॅलो बुलढाणा) पहुरजिरा गावात मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी धाडसी घरफोडी करत तब्बल साडेचार लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे, संपूर्ण कुटुंब लहान मुलांसह हॉलमध्ये झोपलेले असतानाच चोरट्यांनी त्यांना बाहेरून कडी लावून घरात अक्षरशः धुमाकूळ घातला!

वैभव गजानन भालदाने यांनी जलंब पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, ८ ऑगस्टच्या रात्री साडेअकराच्या सुमारास कुटुंबीय हॉलमध्ये झोपले होते. पहाटे चार वाजता त्यांच्या आई-वडिलांना हॉलचा दरवाजा उघडता आला नाही. आवाज ऐकून शेजारील कमलाबाई श्रीराम कोंडे यांनी बाहेरून लावलेली कडी काढली. त्यानंतर घराची पाहणी केली असता धक्कादायक वास्तव समोर आले.

चोरट्यांनी दोन्ही बेडरूमचे कडी-कोंडे आणि लोखंडी कपाटांची कुलपे तोडली होती. कपाटांत ठेवलेली दोन लाख रुपयांची रोकड आणि सुमारे पाच तोळे सोन्याचे दागिने असा अंदाजे साडेचार लाख रुपयांचा मुद्देमाल गायब होता. तक्रारीनुसार, त्यांच्या विवाहित बहिणीची पोत आणि कानातील दागिनेही चोरीला गेले असून त्यांची नेमकी किंमत अद्याप स्पष्ट झालेली नाही.

घरात अख्खे कुटुंब झोपलेले असताना झालेल्या या थरारक चोरीने पहुरजिरा गावात भीतीचे सावट पसरले आहे. जलंब पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!