spot_img
spot_img

CRIME BREAKING! ‘महादेवा’च्या दानावरच टाकला डल्ला! दानपेटी फोडून रोकड-सोन्याचा नाग घेऊन पसार… पण CCTVतील ‘त्या’ हालचालीने फोडले बिंग; जानेफळ पोलिसांनी ४८ तासांत ठोकल्या बेड्या!

जानेफळ (हॅलो बुलढाणा/अनिल राठोड) नागेश्वर महादेव मंदिरातील दानपेटी फोडून भाविकांनी श्रद्धेने अर्पण केलेली रोकड आणि मौल्यवान वस्तूंवर डल्ला मारणाऱ्या आरोपीला जानेफळ पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत जेरबंद केले. आरोपीकडून तब्बल १ लाख ९८४ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

शिवचंद्र मोरेश्वर संस्थानचे अध्यक्ष संदीप महादेव नागरिक यांच्या फिर्यादीवरून ९ ऑगस्ट रोजी जानेफळ पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. २७०/२०२६, बीएनएस कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल झाला होता. मंदिरातील चोरीने भाविकांमध्ये संतापाची लाट उसळल्यानंतर पोलिसांनी CCTV फुटेजची बारकाईने तपासणी केली. गोपनीय बातमीदारांचे जाळे सक्रिय करून तपासाची चक्रे वेगाने फिरवण्यात आली.

तपासात सावत्रा येथील भीमराव माधव गवई याचे नाव समोर आले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर चोरीचा भांडाफोड झाला. आरोपीकडून १८ हजार ९८४ रुपयांची रोकड, २५ हजारांचे दोन मोबाईल, १५ हजारांचा एक ग्रॅम सोन्याचा नाग, चांदीचा नाग, ४२ हजारांची स्प्लेंडर दुचाकी आणि दानपेटी फोडण्यासाठी वापरलेले दोन लोखंडी गज जप्त करण्यात आले.

या गुन्ह्यात दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांचाही सहभाग असल्याची माहिती समोर आली असून पुढील तपास सुरू आहे. API माळी, PSI जाधव, HC मोहन सावंत, PC भागवत पाटोळे, माधव काळे, कृष्णा निकम आणि प्रदीप सौभाग्य यांच्या पथकाने ही धडक कारवाई केली. पोलिसांच्या वेगवान कामगिरीचे ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!