spot_img
spot_img

EXCLUSIVE! रात्री उशिरा दिंडी आयोजक झाले हतबल… अखेर ‘त्या’ व्यक्तीला लावला एक फोन; पुढच्या काही क्षणांत संपूर्ण यंत्रणा दिंडीस्थळी हजर! बुलढाण्याच्या भाईजींनी नेमकं काय केलं की वारकऱ्यांच्या डोळ्यांत दाटले कृतज्ञतेचे अश्रू?

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) एखाद्या व्यक्तीची उंची ही त्याच्या पदावरून नव्हे, तर अडचणीच्या क्षणी त्याने दिलेल्या मदतीवरून ठरत असते.राधेश्याम चांडक (भाईजी) यांनी आपल्या संवेदनशील कृतीतून पुन्हा एकदा हे सिद्ध करून दाखवले.

जवळपास तीन वर्षांपूर्वी रायरेश्वर दिंडीच्या सांगता समारंभात आशीर्वादरूपी मनोगत व्यक्त करताना भाईजींनी वारकऱ्यांना शब्द दिला होता “दिंडी सोहळ्यादरम्यान महाराष्ट्रातच नव्हे, तर भारतात कुठेही अडचण आली, तरी मला फक्त एक फोन करा; माझ्या परीने सर्वतोपरी मदत करेन!”

हा केवळ व्यासपीठावर दिलेला औपचारिक शब्द नव्हता, हे नुकत्याच घडलेल्या प्रसंगाने सिद्ध झाले. दिंडी सोहळ्याच्या यजमानांकडून अन्नदानात कोणतीही कमतरता नव्हती; मात्र रात्री उशिरा वारकऱ्यांच्या मुक्कामाची व्यवस्था करताना आयोजक हतबल झाले. ऐनवेळी त्यांना भाईजींच्या आश्वासनाची आठवण झाली आणि त्यांनी थेट फोन लावला.

रिंग वाजली अन् भाईजींनी तत्काळ फोन उचलला! अडचण आस्थेने समजून घेतली आणि क्षणाचाही विलंब न करता संपूर्ण यंत्रणा कामाला लावली. शाळेचे प्रशासन दिंडीस्थळी दाखल झाले आणि वारकऱ्यांच्या मुक्कामाची व्यवस्था करण्यात तत्परतेने मदत केली.

प्रसंग कदाचित छोटा असेल; पण माणुसकीचा हा आदर्श प्रचंड मोठा आहे! शब्द देणारे अनेक असतात; मात्र शब्दाला जागणारे भाईजींसारखे व्यक्तिमत्त्व दुर्मिळच! म्हणूनच त्यांनी असंख्य नागरिकांच्या हृदयात कायमचे घर केले आहे.

भाईजी, आपले आशीर्वादरूपी प्रेम लोकांवर असेच कायम राहो. ईश्वर आपणास उदंड, निरोगी आणि दीर्घायुष्य देवो हीच मनःपूर्वक प्रार्थना!

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!