spot_img
spot_img

अन् बुलढाण्याचे जिल्हाधिकारी थेट पंपावर धडकले… साठेबाजांचे धाबे दणाणले!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) जिल्ह्यात पेट्रोल-डिझेल टंचाईच्या अफवा पसरताच जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांनी शुक्रवारी थेट मैदानात उतरून पेट्रोल पंपांवर अचानक धाड टाकली. शहरासह प्रमुख महामार्गावरील पंपांवर अचानक पोहोचलेल्या जिल्हाधिकाऱ्यांनी इंधन साठ्याची प्रत्यक्ष पाहणी करत पंप चालकांची चांगलीच झाडाझडती घेतली. ‘स्टॉक रजिस्टर’ तपासणीपासून थेट भूमिगत टाक्यांमधील इंधन मोजणीपर्यंत प्रशासनाने आक्रमक भूमिका घेतल्याने पंप चालकांमध्ये खळबळ उडाली.

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर सुरू असलेल्या टंचाईच्या चर्चेमुळे अनेक पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी ऑईल कंपन्यांचे प्रतिनिधी, पुरवठा विभाग आणि पोलिस प्रशासनासोबत तातडीची बैठक घेत “साठेबाजी करणाऱ्यांना सोडणार नाही” असा कडक इशारा दिला. कृत्रिम टंचाई निर्माण केल्यास परवाना रद्द करण्यासह कठोर कायदेशीर कारवाई होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

“जिल्ह्यात इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. विनाकारण गर्दी टाळावी,” असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. देवरे यांनी केले. पेट्रोल पंपांवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!