spot_img
spot_img

२७० क्विंटल हरभऱ्याचा घोटाळा उघड! ट्रकचालकासह टोळी जाळ्यात; १८.९१ लाखांचा मुद्देमाल जप्त;३०० CCTV फुटेज तपासून एलसीबीची धडाकेबाज कारवाई

धामणगाव बढे (हॅलो बुलढाणा) शेतकऱ्यांचा सरकारी हमीभावाचा हरभरा लंपास करून अपहार करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात ट्रकचालकासह आरोपींना अटक करण्यात आली असून तब्बल १८ लाख ९१ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मोताळा तालुक्यातील लालमाती किन्होळा येथील नाफेड खरेदी केंद्रातून १२ मे रोजी २७० क्विंटल हरभरा ट्रक क्रमांक MH 43 U 5290 मध्ये भरून वखार महामंडळ, मलकापूर येथे पाठविण्यात आला होता. मात्र ट्रक चालक शेख अमीन शेख जमील याने माल वखारात न नेता परस्पर अपहार केल्याची धक्कादायक बाब समोर आली.

पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या आदेशानुसार एलसीबीचे पोलीस निरीक्षक सुनिल अंबुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तब्बल ३०० सीसीटीव्ही फुटेज तपासले. तांत्रिक विश्लेषण व गुप्त माहितीच्या आधारे आरोपींना मलकापूर येथे पकडण्यात आले.

पोलिसांनी ११८.३५ क्विंटल हरभरा, ३ लाखांची रोकड आणि १० लाखांचा ट्रक असा एकूण १८.९१ लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून पुढील तपास धामणगाव बढे पोलीस करत आहेत.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!