ज.जामोद (हॅलो बुलडाणा/ज्ञानदेव राजनकर) अखिल भारतीय केमिस्ट अँड ड्रग्सिष्ट असोसिएशनच्या देशव्यापी भारत बंदच्या हाकेला प्रतिसाद देत जळगाव जामोद तालुका केमिस्ट अँड ड्रग्सिष्ट असोसिएशनच्या वतीने दिनांक २० मे रोजी जळगाव जामोद येथे भव्य मुक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.औषध विक्रेत्यांच्या प्रलंबित व गंभीर मागण्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या आंदोलनात तालुक्यातील औषध विक्रेत्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.देशभरातील औषध विक्रेत्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये ऑनलाईन औषध विक्री तात्काळ बंद करणे, कॉर्पोरेट साखळ्यांकडून होणारे अव्यवसायिक व अनैतिक डिस्काउंट थांबविणे, तसेच बनावट औषधांच्या वाढत्या धोक्यापासून देश व रुग्णांचे संरक्षण करणे या मागण्यांचा समावेश होता. यासंदर्भात केंद्र शासनाने जारी केलेले GSR 817 दि. 28/08/2018 आणि GSR 220 दि. 26/03/2020 हे निर्णय मागे घेण्याची मागणी संघटनेने केली आहे.रुग्णांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अत्यंत गंभीर असून शासनाने याबाबत तातडीने ठोस निर्णय घ्यावा, या मागणीसाठी उपविभागीय अधिकारी शैलेश काळे यांचेमार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन देण्यात आले
मुक मोर्चाची सुरुवात काँटन मार्केट समोरून करण्यात आली. त्यानंतर दुर्गा चौक मार्गे मोर्चा उपविभागीय अधिकारी कार्यालयात पोहोचला. तेथे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले. संघटनेचे मोर्चा पूर्णतः शांततेत पार पडला असून निवेदन सादर केल्यानंतर आंदोलनाचे शांततेत विसर्जन करण्यात आले. भारत बंद आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज रात्री बारा वाजेपर्यंत तालुक्यातील सर्व मेडिकल दुकाने कडकडीत बंद ठेवण्यात आली आहेत. मात्र, अत्यावश्यक वैद्यकीय सेवांसाठी असोसिएशनच्या वतीने विशेष सेवा उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.या आंदोलनामध्ये राजेश काळे जिल्हा संघटन, सचिव अजय पलन तालुका अध्यक्ष ,गिरीश केला सचिव ,तुषार पाटील (EC मेंबर ),प्रवीण टिकार (EC मेंबर), प्रवीण वाकेकर,
संदेश डागा ,राजू बडेरे,मनोज वानखडे,दिपक देशमुख, वृषभ चांडक, शाकीरभाई, सुनील राठी, याचेसह जेष्ठ सदस्य चतुरभुज केला, बन्सी भैया,दिपक उनडकाट, नारायण पाटील,कृष्णकांत अग्रवाल,रमेश काळपांडे, स्वप्नील उमाळे यांचेसह तालुक्यातील सर्व सदस्य उपस्थित होते.










