जळगाव जामोद (हॅलो बुलडाणा/ज्ञानदेव राजनकर) मिशन परिवर्तन अंतर्गत जळगाव जामोद पोलिसांनी कुरेशी मोहल्ला येथे मोठी कारवाई करत कत्तलीसाठी निर्दयतेने बांधून ठेवलेल्या 17 जिवंत गोवंश जनावरांची सुटका केली आहे. जप्त केलेल्या गोवंशाची एकूण किंमत 3,45,000 रुपये आहे. दिनांक 19 मे 2026 रोजी सायंकाळी 7 वाजता पेट्रोलिंग दरम्यान गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, कुरेशी मोहल्ला येथे काही इसमांनी जनावरांना कत्तल करण्याच्या उद्देशाने चारा-पाण्याविना बांधून ठेवले आहे. तात्काळ पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेऊन खात्री केली असता 17 जनावरे निर्दयतेने बांधलेली आढळली. चौकशीत सदर जनावरे शेख शेरा शेख युसुफ, रा. कुरेशी मोहल्ला याच्या मालकीची असल्याचे समोर आले.
जप्त केलेला गोवंश
तांबड्या रंगाचे 09 गोरे – अंदाजे किंमत 90,000 रु.
पांढऱ्या रंगाचा एक गीर बैल – अंदाजे किंमत 10,000 रु.
तांबड्या रंगाचे दोन बैल – अंदाजे किंमत 70,000 रु.
पांढऱ्या रंगाचे पाच बैल – अंदाजे किंमत 1,75,000 रु.एकूण: 3,45,000 रुपयांचा जिवंत गोवंश जप्त आरोपी शेख शेरा शेख युसुफ याच्याविरुद्ध पोलीस स्टेशन जळगाव जामोद येथे अप क्र. 328/2026, कलम 5(क), 9(अ), महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम सहकलम 11(1)(ज), प्राण्यांचा छळ प्रतिबंध अधिनियम 1960 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास जळगाव जामोद पोलीस करीत आहेत.
पोलीस अधीक्षक श्री. निलेश तांबे (भा.पो.से.) यांच्या आदेशाने, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड व उपविभागीय पोलीस अधिकारी आनंद महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या नेतृत्वात पोउपनि नारायण सरकटे, पोउपनि खाडे, पोहवा वरुळकर, पोहवा इरफान, पोहवा निलेश पुंडे, पोहवा मोहाळे, पोहवा मोरे, पोकाॅ सचिन राजपुत, पोकाॅ ढोण, पोकाॅ डब्बे, पोकाॅ सोळंके, पोकाॅ झाल्टे, पोकाॅ पाटोळे, पोकाॅ टोगळे यांनी ही कारवाई केली.












