spot_img
spot_img

माती बोलू लागली सेंद्रिय भाषेत! कृषी विभागाचा भन्नाट प्रयोग चर्चेत

ज.जामोद (हॅलो बुलडाणा/ज्ञानदेव राजनकर) तालुका कृषी अधिकारी जळगांव जामोद रमेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली व पाणी फाऊंडेशनच्या पुढाकाराने सोमवार दिनांक १८ मे रोजी खेर्डा बु. येथे दर्शपर्णी अर्क तयार करण्याचे प्रात्यक्षिक कार्यक्रम संपन्न झाला. सेंद्रिय शेतीकडे शेतकऱ्यांचा कल वाढावा यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला, तसेच रासायनिक कृषी निविष्ठांवर होणारा खर्च कमी कसा करावा यावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले यावेळी उपकृषी अधिकारी ए. व्ही. बोंबटकार आणि सहाय्यक कृषी अधिकारी अविनाश गाडगे यांनी शेतकऱ्यांना दर्शपर्णी अर्क तयार करण्याची पद्धत प्रत्यक्ष दाखवली,हा अर्क जैविक कीटकनाशक म्हणून,मातीची सुपीकता वाढवणारे द्रावण म्हणून आणि पिकांच्या नैसर्गिक वाढीसाठी कसा वापरता येतो याचे मार्गदर्शन त्यांनी केले. शेतकऱ्यांनी विविध वनस्पतींचे नमुने ओळखून अर्क तयार करण्याची कृती सांगितली. या उपक्रमामुळे स्थानिक संसाधनांचा वापर करून कमी खर्चात टिकाऊ शेती करण्याची प्रेरणा शेतकऱ्यांना मिळेल. रासायनिक फवारणीला पर्याय म्हणून दर्शपर्णी अर्कासारखे नैसर्गिक उपाय शेतकऱ्यांच्या आरोग्यासाठी व जमिनीच्या दीर्घकालीन सुपीकतेसाठी फायदेशीर ठरणार आहेत.पुढील काळात सेंद्रिय शेती प्रशिक्षण कार्यक्रम व पाणी फाऊंडेशनचे उपक्रम अधिक व्यापक करण्याचे नियोजन असून सर्व शेतकऱ्यांनी यात स्वयंस्फूर्तीने सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
सदर कार्यक्रमास पोलीस पाटील योगेश म्हसाळ, गजेंद्र तायडे, मुरलीधर जाधव, ज्ञानेश्वर उमाळे, शांताराम वेरूळकर, सुभाष वासनकार, समाधान गिऱ्हे, दुर्योधन उमाळे यांच्यासह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!