spot_img
spot_img

गॅसचा काळाबाजार उघड; शिवसेनेचा इशारा – ७ दिवसांत कारवाई नाही तर आंदोलन!

चिखली (हॅलो बुलढाणा) रायपूर येथील भारल गॅस एजन्सीकडून सुरू असलेल्या कथित काळाबाजाराचा मोठा पर्दाफाश होत असून, याविरोधात शिवसेनेचे उपशहर प्रमुख श्री. राहुल रामदास वरवंडे यांनी तहसीलदारांकडे जोरदार निवेदन सादर केले आहे. सैलानीनगर परिसरात गॅस सिलेंडरचा अवैध साठा ठेवून नागरिकांकडून अधिक दराने विक्री केली जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

निवेदनानुसार, उज्वला योजनेतील लाभार्थ्यांकडूनही ५०० ते १००० रुपये अतिरिक्त आकारले जात असून, सामान्य ग्राहकांकडूनही २०० ते ३०० रुपये जास्त घेऊन गॅस दिला जात आहे. हा प्रकार शासकीय यंत्रणेच्या आशीर्वादानेच सुरू असल्याचा थेट आरोप शिवसेनेने केला आहे.

याहूनही धक्कादायक बाब म्हणजे सैलानीनगरमध्ये अत्यंत असुरक्षित पद्धतीने ऑटो व कारमध्ये थेट गॅस भरला जात आहे. या प्रकारामुळे मोठा स्फोट होण्याची शक्यता असून नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला आहे.

शिवसेनेचे शहर प्रमुख श्रीराम भाऊ झोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सादर करण्यात आलेल्या या निवेदनात संबंधित गॅस एजन्सीवर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

प्रशासनाने ७ दिवसांत ठोस पावले उचलली नाहीत, तर उबाठा पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!