spot_img
spot_img

शेतकऱ्यांच्या हितासाठी आमदारांचा ‘धडाडीचा निर्णय’ – मेहकरमध्ये डिझेल पुरवठ्यावर महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

मेहकर (हॅलो बुलढाणा) सध्या राज्यात पेट्रोल-डिझेल पुरवठ्याबाबत निर्माण झालेल्या चर्चांना पूर्णविराम देत मेहकर येथे शेतकऱ्यांच्या हितासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आणि निर्णायक बैठक संपन्न झाली. तहसील कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीचे अध्यक्षस्थान आमदार सिद्धार्थ खरात यांनी भूषवले असून, त्यांच्या ठाम भूमिकेमुळे संपूर्ण परिसरात शेतकऱ्यांमध्ये दिलासा आणि विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे.

बैठकीत पेट्रोल पंप मालक, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी तसेच संबंधित प्रशासन उपस्थित होते. विशेषतः शेतीकामासाठी आवश्यक असलेले डिझेल वेळेवर आणि सुरळीत उपलब्ध व्हावे, यावर सखोल चर्चा करण्यात आली. अनेक शेतकऱ्यांची शेती गावापासून दूर असल्याने ट्रॅक्टर घेऊन पंपावर जाणे व्यवहार्य नाही, ही वास्तव परिस्थिती लक्षात घेऊन आमदारांनी स्पष्ट शब्दांत व्यावहारिक तोडगा काढण्याचे निर्देश दिले.

शेतकरी हा या व्यवस्थेचा कणा आहे, त्याच्या कामात कोणतीही अडचण सहन केली जाणार नाही,असे त्यांनी ठणकावून सांगितले. आमदारांनी पेट्रोल पंप चालकांना सहकार्याची भूमिका घेण्याचे आवाहन केले. त्यांच्या या आक्रमक आणि स्पष्ट भूमिकेमुळे संपूर्ण प्रशासन यंत्रणा तत्काळ कामाला लागल्याचे चित्र दिसून आले.

तसेच पेट्रोल पंपांवर गर्दी, रांगा आणि गैरव्यवस्था टाळण्यासाठी विशेष नियोजनाचे आदेश देण्यात आले. रुग्णवाहिका, पाणी टँकर, शासकीय वाहने आणि आपत्कालीन सेवांना प्रथम प्राधान्य देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

बैठकीत शेतकऱ्यांना डिझेल थेट उपलब्ध करून देण्याच्या प्रक्रियेबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात आला असून, स्थानिक पातळीवर पुरवठा सुरळीत राहील याची खात्री देण्यात आली आहे.

संपूर्ण बैठकीत आमदार सिद्धार्थ खरात, नगराध्यक्ष किशोर गारोळे यांची भूमिका अत्यंत ठाम, स्पष्ट आणि जनहित व शेतकरीहिताची असल्याचे दिसून आले. त्यांच्या पुढाकारामुळे शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण असून शेतकऱ्यांसाठी खऱ्या अर्थाने मैदानात उतरलेले नेतृत्व अशी जोरदार चर्चा परिसरात सुरू आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!