spot_img
spot_img

BIG CRIME NEWS! आधी जंगलात नेलं… मग निर्वस्त्र करून व्हिडिओ काढला! ‘पैसे द्या, नाहीतर व्हिडिओ व्हायरल करू!’ चाकूच्या धाकावर फोन-पेवरून अग्रवाल-ठोसर यांच्या खात्यात पैसे टाकायला भाग पाडल्याचा आरोप; मलकापुरात खतरनाक कांड! सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल! ‘त्या’ सापळ्यामागे कोण, पैशांचा धागा कुठपर्यंत?

मलकापूर (हॅलो बुलढाणा) “मलकापूरला चला, व्यवसायात जास्त नफा मिळेल!” चहाच्या टपरीवर भेटलेल्या अनोळखी व्यक्तीच्या या आमिषावर विश्वास ठेवणे तेलंगणातील मेंढी-बकरी व्यापाऱ्याला महागात पडल्याची धक्कादायक तक्रार समोर आली आहे. निर्जन जंगलात नेऊन चाकूच्या धाकावर लूट, फोन-पेवरून जबरदस्तीने पैसे हस्तांतरित करणे आणि अपमानजनक व्हिडिओच्या आधारे धमकावल्याचा आरोप तक्रारीत आहे.

नस्कल येथील व्यापारी सिरा भानू हे मेहुणा प्रोहित आणि चालक प्रवीणसोबत मेंढ्या खरेदीसाठी निघाले होते. २३ ऑक्टोबरच्या रात्री नविपेट येथे भेटलेल्या व्यक्तीने मलकापुरातील व्यवहाराचे आमिष दाखवले. मिळालेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर त्यांना लोकेशन पाठवण्यात आले.

२४ ऑक्टोबरला सकाळी ते मलकापुरातील एका राममंदिराजवळ पोहोचले. तक्रारीनुसार, मास्क घालून पल्सरवर आलेली व्यक्ती भानू आणि प्रवीणला दोन-तीन किलोमीटरवरील निर्जन परिसरात घेऊन गेली. तेथे साथीदारांच्या मदतीने दोघांना मारहाण करून ८१ हजार रुपये, चार ग्रॅमची अंगठी आणि पंधरा ग्रॅमची सोनसाखळी हिसकावण्यात आली.

पण लूट इथेच थांबली नाही! चाकू दाखवून यूपीआय पिन सांगण्यास भाग पाडले. भानूच्या खात्यातून ९० हजार, तर मेहुण्याच्या खात्यातून ५० हजार रुपये हस्तांतरित केल्याचे तक्रारीत नमूद आहे. रोख आणि डिजिटल व्यवहार मिळून २ लाख २१ हजार रुपये, त्याशिवाय दागिने व मोबाईल लुटल्याचा आरोप आहे.

व्हिडिओत ‘कबुली’, पण तक्रारीत वेगळीच कहाणी!

चालकाचे आक्षेपार्ह व अपमानजनक व्हिडिओ काढून, “बनावट नोटांसाठी आलो होतो,” असे जबरदस्तीने वदवून घेतल्याचाही आरोप आहे. घटना सांगितल्यास व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याचे तक्रारदाराने म्हटले आहे.

यूपीआयवर पैसे कोणाच्या नावे गेले?

तक्रारीतील व्यवहारांच्या तपशिलानुसार, अर्पण किशोर अग्रवाल यांच्या नावे नमूद असलेल्या यूपीआय खात्यावर भानूच्या खात्यातून ९० हजार आणि प्रोहितच्या खात्यातून ३० हजार, असे एकूण १ लाख २० हजार रुपये हस्तांतरित झाले. तर ज्योती दीपक ठोसर यांच्या नावे नमूद असलेल्या यूपीआय खात्यावर प्रोहितच्या खात्यातून २० हजार रुपये पाठवण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. चाकूच्या धाकावर हे व्यवहार करवून घेतल्याचा आरोप असून, संबंधित खातेदारांचा या गुन्ह्यातील सहभाग व भूमिका तपासातून स्पष्ट होणे बाकी आहे.

सायबर तक्रारीनंतर १,४६,९८६ रुपये बँक खात्यांत रोखल्याचा संदेश मिळाल्याचेही तक्रारीत नमूद आहे. तेलंगणातील निजामपेठ पोलिसांनी ३ नोव्हेंबरला झिरो एफआयआर नोंदवून प्रकरण मलकापूर पोलिसांकडे वर्ग केले.आमिष दाखवणारा कोण? पैसे स्वीकारणाऱ्या खात्यांचा या टोळीशी संबंध काय? अन् व्हिडिओमागे आणखी किती बळी? या प्रश्नांची उत्तरे आता तपासातूनच समोर येणार आहेत.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!