spot_img
spot_img

इंदिरा नगरमध्ये गांज्याचा साठा उघड! 4.60 लाखांचा गांजा जप्त; आरोपी फरार

चिखली (हॅलो बुलडाणा/ सय्यद साहिल) स्थानिक गुन्हे शाखेने पुन्हा एकदा धडाकेबाज कारवाई करत इंदिरा नगर परिसरात मोठा गांज्याच्या साठा उघड केला आहे. सैय्यद समीर सैय्यद सलीम (वय 38) यांच्या राहत्या घरावर छापा टाकून तब्बल 9 किलो 200 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला असून त्याची अंदाजे किंमत 4 लाख 60 हजार रुपये असल्याची माहिती समोर आली आहे.

ही कारवाई आज रात्री करण्यात आली. नायब तहसीलदार वीर साहेब, शासकीय पंच यांच्या उपस्थितीत संपूर्ण पंचनामा पार पडला. मात्र, पोलिसांची कारवाई सुरू होताच आरोपी सैय्यद समीर हा फरार झाला असून त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथके तयार केली आहेत.

या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून गांजा तस्करीच्या या जाळ्याचा मोठा पर्दाफाश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, श्रेणिक लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनिल अंबुलकर यांच्या नेतृत्वात पार पडली. API यशोदा कणसे, अनुपकुमार मेहेर, विजय वारुळे, समाधान टेकाळे,अरविंद बडगे, मंगेश संनगाळे,अमोल वनारे, सतिश नाटेकर, रवी भिसे यांच्यासह पोलिसांच्या पथकाने ही कारवाई यशस्वी केली असून पोलिसांच्या या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!