spot_img
spot_img

चिखलीच्या राऊतवाडीत पोलिसांचा स्टिंग! घरातूनच गांजा साठा पकडला

चिखली (हॅलो बुलडाणा/ सय्यद साहिल) पोलिसांनी गांजा तस्करीविरोधात मोठी आणि धडाकेबाज कारवाई करत राऊतवाडी परिसरात राहत्या घरातूनच तब्बल 2 किलो 780 ग्रॅम गांजा सदृश्य पदार्थ जप्त केला आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून अवैध अमली पदार्थ व्यापाराला मोठा धक्का बसला आहे.

ही कारवाई आज संध्याकाळी सुमारे 8:30 वाजता करण्यात आली. आरोपी पवन चंपालाल रामावत (वय 35, रा. राऊतवाडी, चिखली) याच्या राहत्या घरावर छापा टाकण्यात आला. घराची झडती घेतली असता गांजा सदृश्य पुड्या आढळून आल्या. जप्त करण्यात आलेल्या मालाची किंमत अंदाजे 1 लाख 40 हजार रुपये इतकी असल्याचे सांगण्यात येत आहे.

ही संपूर्ण कारवाई राजपत्रित अधिकारी नायब तहसीलदार मुरलीधर गायकवाड आणि शासकीय पंच यांच्या उपस्थितीत पंचनामा करून पार पडली. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, चिखली पोलीस स्टेशनचे ठाणेदार भूषण गावंडे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

या धडाकेबाज कारवाईमुळे अमली पदार्थ विक्रेत्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!