spot_img
spot_img

चिखलीत भंगार दुकानाला भीषण आग; लाखोंचे नुकसान, मोठा अनर्थ टळला..!

चिखली (हॅलो बुलढाणा/ सय्यद साहिल) शहरातील गजबजलेल्या बॉम्बे मार्केट परिसरात आज सकाळी भीषण आग लागल्याने एकच खळबळ उडाली. बॉन्द्रे पेट्रोल पंपाच्या शेजारी असलेल्या जहीर खान कुरेशी यांच्या भंगार दुकानाला अचानक आग लागल्याने परिसरात धुराचे प्रचंड लोट पसरले आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

आग इतकी भीषण होती की काही वेळातच दुकानातील मोठ्या प्रमाणातील भंगार साहित्य जळून खाक झाले. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. पेट्रोल पंपाच्या अगदी शेजारीच आग लागल्यामुळे काही काळ मोठा अनर्थ घडण्याची भीती निर्माण झाली होती. मात्र, स्थानिक नागरिक, व्यापारी आणि अग्निशमन विभागाच्या तत्परतेमुळे आगीवर वेळेत नियंत्रण मिळवण्यात यश आले. त्यामुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली.

घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि अग्निशमन विभाग घटनास्थळी दाखल झाले. आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, याबाबत तपास सुरू आहे. शहराच्या मध्यभागी घडलेल्या या घटनेमुळे चिखलीत एकच खळबळ उडाली आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!