spot_img
spot_img

आईसह २ वर्षांचा चिमुकला बेपत्ता; धाड पोलिसांची धावपळ, नागरिकांना आवाहन!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) चांडोळ येथे एक धक्कादायक घटना समोर आली असून विवाहित महिला आणि तिचा अवघा दोन वर्षांचा मुलगा रहस्यमयरीत्या बेपत्ता झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी धाड पोलीस स्टेशनमध्ये मिसिंग क्रमांक ०४/२०२६ दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सचिन सुनिल देशमुख (रा. चांडोळ) यांनी तक्रार दिली की, त्यांची पत्नी वैशाली सचिन देशमुख (वय २४) या १८ एप्रिल रोजी दुपारी पांग्री येथे नातेवाईकांकडील सामान आणण्यासाठी जात असल्याचे सांगून घरातून निघाल्या होत्या. त्यांच्यासोबत त्यांचा २ वर्षांचा मुलगाही होता. मात्र, संध्याकाळपर्यंत दोघेही परत न आल्याने नातेवाईक व परिसरात शोधाशोध करण्यात आली; तरीही कोणताही सुगावा लागला नाही.

अखेर हतबल कुटुंबीयांनी पोलिसांकडे धाव घेतली. महिलेची उंची सुमारे ५.५ फूट, गोरा रंग, काळे वाढलेले केस असे वर्णन देण्यात आले आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी शोधमोहीम तीव्र केली आहे.

या महिला व चिमुकल्याबाबत कोणतीही माहिती असल्यास तात्काळ धाड पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!