बुलढाणा (हॅलो बुलडाणा) शहरातील ज्येष्ठ नागरिक व नगरपरिषद बुलढाणाचे सेवानिवृत्त अधीक्षक श्री. शंकरराव उर्फ बाळासाहेब वामनराव पाठक (वय 87) यांचे दीर्घ आजाराने रविवार, दिनांक ३ मे रोजी रात्री ९:२० वाजता दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने शहरात हळहळ व्यक्त होत असून प्रशासनातील एक प्रामाणिक व माजी कर्तव्यदक्ष अधिकारी हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
बाळासाहेब पाठक यांनी आपल्या सेवाकाळात नगरपरिषदेत विविध जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडत शहराच्या विकासात मोलाचे योगदान दिले. त्यांच्या साध्या, मनमिळाऊ व शिस्तप्रिय स्वभावामुळे सहकारी व नागरिकांमध्ये त्यांना विशेष मानाचे स्थान होते. सेवानिवृत्तीनंतरही त्यांनी सामाजिक कार्यात सहभाग ठेवत अनेकांना मार्गदर्शन केले.
त्यांच्या पार्थिवावर सोमवार, दिनांक ४ मे रोजी सकाळी १०:३० वाजता पाठक गल्ली येथून अंत्ययात्रा निघून जुनी स्मशानभूमी, आठवडी बाजार, बुलढाणा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे .त्यांच्या पश्चात कुटुंबीय, नातेवाईक व मित्रपरिवार असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने सर्वत्र शोककळा पसरली आहे.











