spot_img
spot_img

तत्परतेने वाचवला जीव; भाजप पदाधिकाऱ्यांचे मानवतावादी कार्य कौतुकास्पद

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) शहरातील सरस्वती नगर परिसरात घडलेल्या एका घटनेत, भाजप पदाधिकाऱ्यांच्या तत्परतेमुळे एका जखमी व्यक्तीचा जीव वाचल्याची हृदयस्पर्शी घटना समोर आली आहे. मुख्य रस्त्यावर एक व्यक्ती गंभीर जखमी अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसताच भाजप शहराध्यक्ष मंदार बाहेकर आणि जिल्हा कार्यालय मंत्री मुकुंद देशपांडे यांनी क्षणाचाही विलंब न लावता मदतीसाठी धाव घेतली.

घटनास्थळी रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याचे लक्षात येताच त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून जखमी व्यक्तीला स्वतःच्या वाहनातून तातडीने सरकारी दवाखान्यात दाखल केले. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, वेळेत उपचार मिळाल्यामुळे त्या व्यक्तीची प्रकृती आता स्थिर असून तो धोक्याबाहेर आहे.

या घटनेमुळे उपस्थित नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, बाहेकर आणि देशपांडे यांच्या तत्पर निर्णयक्षमतेचे व मानवतावादी दृष्टिकोनाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!