बुलढाणा (हॅलो बुलडाणा) राजकीय वर्तुळात खळबळ उडवणाऱ्या ‘शिवाजी कोण होता?’ या गोविंद पानसरे लिखित पुस्तकावरून सुरू झालेला वाद आता राज्यस्तरावर पोहोचला आहे. आजच आंदोलकांनी बुलढाण्यात आंदोलन केले.शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांच्याशी केलेला कथित वादग्रस्त फोन कॉल सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मोठा राजकीय भडका उडाला आहे.
या घटनेवर विरोधकांनी तीव्र संताप व्यक्त करत गायकवाड यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. तर सामाजिक व साहित्यिक क्षेत्रातूनही या भाषेचा निषेध करण्यात आला आहे. दरम्यान, गोविंद पानसरे यांच्या कुटुंबीयांनीही या प्रकारावर नाराजी व्यक्त करत विचारस्वातंत्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही नाराजी व्यक्त करत संजय गायकवाड यांना अप्रत्यक्षरीत्या सुनावले आहे. “ज्यांनी आक्षेप घेतला आहे त्यांनी आधी ‘शिवाजी कोण होता?’ हे पुस्तक वाचले आहे का?” केवळ प्रसिद्धीसाठी चर्चेत राहणे असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
या वक्तव्यानंतर राजकीय वातावरण अधिकच तापले असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली आहे. बुलढाण्यातही या मुद्द्यावर तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पुढील काही दिवसांत या प्रकरणाला नवे वळण मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.










