spot_img
spot_img

एकाच रात्री चार घरी चोरी; एक लाख 65 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास! चोरट्याचा लहान मुलांच्या खाऊच्या गल्ल्यावरही डल्ला!

देऊळगाव राजा ( हॅलो बुलढाणा/संतोष जाधव) चार घरात अज्ञात चोरट्याने एकाच रात्री रोख रक्कम, सोने-चांदीच्या दागीने अशा एकुण 1,65,500 रुपयांच्या ऐवजावर डल्ला मारला.या चोराला लहान मुलांचा खाऊच्या पैशाचा गल्लाही पूरला नाही.त्याने गल्ला फोडून जवळपास पाच हजार रुपयांची चोरी करून उभारा केल्याची घटना देऊळगाव महीत समोर आली आहे.

देऊळगाव राजा तालुक्यातील देऊळगाव मही येथे अज्ञात चोरट्याने काल 10 ऑगस्टच्या मध्यरात्री चार घरांना लक्ष्य करून तब्बल 1,65,500 रुपयांचा यवत चोरी केल्याची घटना घडली आहे. पोलीस सूत्रानुसार, अज्ञात चोरट्याने रात्रीच्याअंधाराचा फायदा घेऊन फिर्यादी शिवाजी चव्हाण यांच्या घरात प्रवेश करुन त्यांच्याघरातील कपाटामध्ये असलेले नगदी ₹ 90,000 तसेच फियार्दी यांच्या घराशेजारी राहणारे शिवाजी रमेश म्हस्के यांच्या घरातील नगदी ₹ 10,000 व एक अर्धा ग्रॅम सोन्याची अंगठी किंमत ₹ 7,000 त्याचप्रमाणे सुभाष भगवान इंगळे यांच्या घरातील नगदी ₹ 35,000 व चांदीचे नाणे वजन 15 ग्रॅम किंमत ₹ 3,500 लंपास केले आहे.त्यानंतर चोरट्याने ज्ञानेश्वर सौंदाजी बुधवत यांच्या घरातील लहान मुलांचा गल्ला फोडुन अंदाजे ₹ 5,000 व कपाटातील ₹ 15,000 असे एकुण ₹ 1,65,500 च्या ऐवजावर हात साफ केला आहे.

पोलिसांनी या प्रकरणी कलम 303 (2),331(2) बिएनएस नुसार गुन्हा दाखल केला आहे.या प्रकरणाचा पूढील तपास पोलीस निरीक्षक ब्रम्हा गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि राजकुमार मोहोळकर करीत आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!