spot_img
spot_img

खामगांव-जालना रेल्वे मार्गाचा प्रधानमंत्री गती शक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅनमध्ये समावेश! केंद्रिय रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांची भेट घेवून केंद्रिय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी व्यक्त केले आभार!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) इंग्रज काळा पासुन बहुप्रतिक्षीत असलेल्या खामगांव-जालना रेल्वे मार्गाचा समावेश प्रधानमंत्री गती शक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅन मध्ये करण्यात आला आहे.त्यामुळे खामगांव-जालना रेल्वे मार्गाला गती मिळणार असून भूमी अधिग्रहण प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. आज केंद्रिय रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांची केंद्रिय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी प्रत्यक्ष भेट घेवुन आभार व्यक्त केले.या रेल्वे प्रकल्पांना गती देण्यासाठी आपल्या अध्यक्षतेखाली रेल्वे विभागाच्या उच्चस्तरीय अधिकारी आणि जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक बोलविण्याची मागणी केली आहे.

१३ ऑक्टोबर २०२१ रोजी सुरू करण्यात आलेल्या पीएम गतीशक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅन अंतर्गत १०० लाख कोटी रुपयांचा निधी राखून ठेवण्यात आला आहे . या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून बहुविध वाहतूक साधनांना चालना देण्याचे काम केल्या जाते. या प्रकल्पा अंतर्गत खामगांव-जालना रेल्वे मार्गचा समावेश करण्यात आला आहे.त्यामुळे खामगांव-जालना रेल्वे मार्गाला गती मिळणार असून भूमी अधिग्रहण प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. बुलढाणा जिल्हयातील खामगांव-जालना रेल्वे मार्ग व्हावा अशी माझ्यासह जिल्हयातील नागरीकांची अपेक्षा आहे. हा मुद्दा विकासासोबतच लोकभावनेचा सुध्दा आहे. हा रेल्वे मार्ग विदर्भ मराठवाडा या दोन विभागांना जोडणारा आहे. शिवाय मध्य आणी दक्षीण रेल्वे मार्गांनाही जोडणारा ठरणार असुन सध्या प्रलचित असलेल्या मध्य आणिा दक्षीण रेल्वे मार्गातील अंतर कमी करणारा ठरणार आहे.
बुलढाणा जिल्हयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राष्ट्रमाता जिजाऊंचे जन्मस्थळ आहे. लोणार येथे खाऱ्या पाण्याचे जगविख्यात सरोवर आहे. तर शेगांव येथे श्री.संत गजानन महाराजांचे समाधी स्थळ आहे. या रेल्वे मार्गामुळे व्यापार पर्यटन आणि कृषी उत्पादनासोबतच औद्योगीक विकासाला चालना मिळणार आहे.

▪️रेल्वे प्रकल्पाला गती देण्यासाठी रेल्वे विभागातील उच्चस्तरीय अधिकारी व जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक लावण्याची केली मागणी!

अकोला खंडवा या रेल्वेमार्गात अंतर्गत जिल्ह्यातील संग्रामपूर जळगाव जामोद तालुक्यातून नवीन रेल्वे मार्ग टाकण्याचे काम केल्या जात आहे. या रेल्वे मार्गाचे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. तसेच खामगाव जालना रेल्वे मार्गाचे भूमी अधिग्रहणाचे काम सुरू झाले आहे. यानंतरची प्रक्रिया ही अधिक गतिशीलतेने होण्याच्या दृष्टिकोनातून आपल्या अध्यक्षतेखाली रेल्वे प्रशासनातील उच्चस्तरीय अधिकारी व बुलढाणा जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेण्यात यावी अशी आग्रही मागणी केंद्रीय राज्यमंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे भूमिपुत्र खासदार प्रतापराव जाधव यांनी आज केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची प्रत्यक्ष भेट घेऊन केली आहे. या मागणीला रेल्वेमंत्र्यांनीही सकारत्मकता दर्शविली आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!