मेहकर (हॅलो बुलडाणा) तालुक्यातील दुधा परिसरात पैनगंगा नदी काठावरील शेतकऱ्यांवर संकट कोसळले असून 24 एप्रिलच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी वीज व पाण्याच्या मोटरला जोडलेल्या केबल्सची मोठ्या प्रमाणावर चोरी केली. या घटनेमुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून शेतीचे कामकाज अक्षरशः ठप्प झाले आहे.
पिकांना पाणी देणे अशक्य झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. आधीच अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांवर आता या चोरीमुळे दुहेरी संकट ओढवले आहे. संतप्त शेतकऱ्यांनी पोलिस प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली असून तात्काळ कारवाईची मागणी केली आहे.
दरम्यान, शेतकऱ्यांनी एकत्र येत पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज सादर केला असून चोरट्यांचा त्वरित बंदोबस्त करावा, चोरीस गेलेले साहित्य परत मिळवून द्यावे आणि परिसरात रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी केली आहे.










Total Users : 3288372