spot_img
spot_img

मुंडकं सापडलं, धड सापडलं… पण ‘ती’ कोण? पोलिसांपुढे मोठं कोडं; ज.जामोदच्या राजुरा शिवारातील भीषण हत्याकांडाचा उलगडा जवळ? पोलिसांची शोधपत्रिका जारी; नागरिकांना आवाहन

जळगाव जामोद(हॅलो बुलडाणा/ ज्ञानदेव राजनक) तालुक्यातील राजुरा शिवारात सापडलेल्या धडापासून वेगळ्या मुंडक्याच्या घटनेने संपूर्ण बुलढाणा जिल्हा हादरला असतानाच आता या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. “हॅलो बुलढाणा”ने वृत्त प्रसारित केल्यानंतर जळगाव जामोद पोलिसांनी अज्ञात मृत महिलेची ओळख पटविण्यासाठी अधिकृत शोधपत्रिका जारी केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महिला अंदाजे 20 ते 30 वयोगटातील असून उंची सुमारे 5 ते 5.3 फूट, मध्यम बांधा, सावळा वर्ण आणि काळे केस अशी वैशिष्ट्ये आहेत. तिच्या अंगावर हिरव्या रंगाचा टॉप, काळ्या रेषांचा कथिया रंगाचा पँट, निळसर ब्रा, गुलाबी सॅन्डल, उजव्या हातात काळा धागा आणि डाव्या हातात हिरवट बांगड्या आढळल्या आहेत. विशेष म्हणजे, शिर धडापासून वेगळे करण्यात आले असल्याने हा प्रकार अत्यंत क्रूर आणि नियोजित खून असल्याचा संशय अधिकच गडद झाला आहे.

या प्रकरणामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून पोलिसांनी आवाहन केले आहे की, अशा वर्णनाची महिला कुठे हरवलेली असल्यास तात्काळ जळगाव जामोद पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा. तपासाला वेग देण्यात आला असून लवकरच या रहस्यमय हत्याकांडाचा पर्दाफाश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!