बुलढाणा (हॅलो बुलडाणा) जिल्हा परिषद आयोजित अधिकारी-कर्मचारी सांस्कृतिक स्पर्धांच्या पहिल्याच दिवशी कला आणि भावनांचा स्फोट पाहायला मिळाला.शॅडो ॲक्टच्या माध्यमातून सादर करण्यात आलेली स्वर्गीय अजित पवार यांना अर्पण केलेली श्रद्धांजली इतकी हृदयस्पर्शी होती की सभागृह क्षणभर स्तब्ध झाले.
एकात्मिक बाल विकास सेवा योजना, ग्रामीण प्रकल्प बुलढाणा येथील कलावंत संचाने सादर केलेल्या या सादरीकरणात स्व. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री असताना राबविलेल्या जनहितकारी योजनांचा प्रभावी आणि ठसठशीत आढावा घेण्यात आला. राज्याच्या विकासात त्यांनी बजावलेली भूमिका, निर्णयक्षमता आणि दूरदृष्टी शॅडो ॲक्टमधून जिवंत झाली.
विशेष म्हणजे, दुर्दैवी विमान अपघाताचा प्रसंग अत्यंत संवेदनशीलतेने मांडण्यात आला. प्रकाश-छायांच्या खेळातून उभे राहिलेले दृश्य अनेकांच्या डोळ्यात पाणी आणणारे ठरले.




Total Users : 3555399