बुलढाणा (हॅलो बुलडाणा) जिल्ह्यातील ग्रामीण पार्श्वभूमीवर आधारित मराठी सामाजिक चित्रपट ‘धाराऊ’ सध्या जागतिक चित्रपट महोत्सवांमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करत आहे. बुलढाणा अर्बन मीडिया हाऊस प्रस्तुत आणि मा. श्री. राधेश्यामजी चांडक (भाईजी) निर्मित, तसेच पूर्णपणे बुलढाण्यात चित्रित झालेला आणि बुलढाण्यातील कलाकारांचा सहभाग असलेला हा चित्रपट लेखक-दिग्दर्शक मनिष सुरेश शिंदे यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झाला आहे.
‘धाराऊ’ हा चित्रपट ग्रामीण जीवनशैली, सामाजिक संवेदनशीलता आणि मानवी भावनांवर आधारित असून, आजच्या समाजातील काही महत्त्वाच्या प्रश्नांना वास्तववादी दृष्टिकोनातून मांडतो. हा चित्रपट कौटुंबिक प्रेक्षकांसाठी उपयुक्त असा भावनिक अनुभव देणारा सामाजिक सिनेमा आहे.
या चित्रपटाला आंतरराष्ट्रीय स्तरावर खालील पुरस्कार व मानांकन प्राप्त झाले आहेत:
World Premiere Film Awards 2025 मध्ये
Best Family Drama,
Best Cinematography,
Best Drone Operator,
Best Musical,
Best Youth Actor.
Picasso International Film Festival मध्ये
Best Writer पुरस्कार.
Sweden Film Awards मध्ये
Finalist म्हणून निवड.
तसेच 2026 साली होणाऱ्या
Mysuru International Film Festival,
International Art Film Festival of India,
Indian Independent Film Festival,
EURASIA International Film Festival,
Pan Asian Film Festival,
Indian Premiere Film Festival
या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये ‘धाराऊ’ची अधिकृत निवड झाली आहे.










