बुलढाणा (हॅलो बुलडाणा) स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अनेक पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून पक्ष बदलाचे वारे बुलढाण्यात वाहत आहेत.दरम्यान उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख पद्माताई नितीन परदेशी यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनामध्ये पक्षप्रवेश झाला आहे.
29 जून रोजी हा पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला. शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्या जयस्तंभ चौकातील मातोश्री जनसंपर्क कार्यालयात हा छोटेखानी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. आमदार तथा शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख संजय गायकवाड यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख पद्माताई नितीन परदेशी यांच्यासह चंद्रभागा भारत इंगळे, माया संतोष खराडे, यांच्यासह असंख्य महिला पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटाच्या शिवसेना पक्षांमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटात एकच खळबळ उडाली आहे.