spot_img
spot_img

💥पॉलिटिक्स! स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत लागणार पक्षश्रेष्ठींची प्रतिष्ठा पणाला!

बुलडाणा (हॅलो बुलडाणा) सन २०१६ मध्ये झालेल्या नगर पालिका निवडणुकीचा धांडोळा घेतला असता, प्रथम क्रमाकांची मते वंचित बहुजन आघाडी तेव्हाच्या भारिपला मिळाली होती.त्यावेळी बुलडाण्यात युती झाली नव्हती तर एकत्रित शिवसेनेला दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती.तर भाजप हा तिसऱ्या क्रमांकावर व काँग्रेस चौथ्या क्रमांकावर होती. त्यामुळे यंदाच्या अगामी निवडणुकीत पक्ष श्रेष्ठींची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.

जिल्ह्यातील नगर पालिका व नगर पंचायतींची स्थिती बघता नगरसेवक सर्वाधिक काँग्रेसचे १०३ तर भाजपचे ७५ इतके होते तर सेना तिसऱ्या स्थानावर ५१ इतके नगरसेवक होते. पण मलकापुर,मेहकर मध्ये भाजपला भोपळाही फोडता आला नव्हता. सेनेलाही मलकापूर, नांदुरा,खामगाव,संग्रामपूर येथे एकही सदस्य निवडुन आला नव्हता. भारिप फक्त् शेगाव, संग्रामपूर, खामगाव, बुलडाणा व जळगाव जामोद येथे सदस्य निवडुन आले होते. सध्या मोताळा व संग्रामपूर नगर पंचायती असून परिस्थिती सर्वच पक्षाची तेथे बदललेली आहे. काँग्रेस मात्र सर्वच नगर पालीकांमध्ये होती. जवळपास नऊ नगर पालिकांची नऊ वर्षानंतर निवडणुक होणार आहे. या नऊ वर्षात बरेच पाणी वाहुन गेले. पक्षाचे नेतृत्वाची अदलाबदल झाली आहे. त्यामुळे अगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीत काय होते, याकडे राजकियांचे लक्ष लागून आहे.

▪️बुलडाणा नगराध्यक्षपदात मिळालेली मते

२८ नोव्हेंबर २०१६ रोजी नगराध्यक्ष पदाच्या विजयी उमेदवाराची घोषणा नगर परिषद निवडणुक अधिकारी यांनी केली होती. यामध्ये काँग्रेसच्या उमेदवार लक्ष्मी दत्ता काकस यांना ६०८४, अपक्ष संगीता सुरेश काेरके यांना १३२, पुजा संजय गायकवाड सेना १०३५१, भारिपच्या नजमुन्नीसा बेगम मोहम्मद सज्जाद ११४३०, अपक्ष नाजमीन आरा शे सत्तार १५४, भाजपच्या कुंदा विष्णु पाटील ७०६७, राष्ट्रवादीच्या अनिता महादेव शेळके २०५१, अपक्ष विद्या दिनकर संभारे १५२ मते मिळाली होती. २४३ मतदात्यांनी नोटाला मते दिली होती. एकुण ३७६६४ इतके मतदान झाले होते.

▪️भारिपमुळे काँग्रेस आली होती अडचणीत

काँग्रेसचे जे मतपेटी होती ती अर्धी अधिक भारिप बमसंकडे वळली होती. मुस्लीम उमेदवार असल्याने मुस्लीम मते व अनुसुचित जातीची मते काँग्रेसपासुन तुटली होती. राष्ट्रवादी स्वतंत्र लढल्याने ती मतेही पांगली होती. त्यामुळे सर्वात मोठा फटका काँग्रेसला बसला होता. भाजपची मते बाहेर मोठया प्रमाणात बाहेर पडली नव्हती. भाजपचे तत्कालीन नेतृत्वाबाबतही शंकाच होती. सेनेचा अवघ्या १०७९ मतांनी पराभव झाला होता.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!