बुलढाणा (हॅलो बुलडाणा) महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या नुकत्याच जाहीर झालेल्या उन्हाळी २०२५ परीक्षेचा निकालात बुलढाण्यातील कॅम्ब्रिज कॉलेज ऑफ फार्मसीने जबरदस्त कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधले आहे. स्व. रामभाऊ लिंगाडे प्रतिष्ठानच्या संचालनाखालील या महाविद्यालयाने द्वितीय वर्षात थेट १००% निकालाची उंची गाठली, तर प्रथम वर्षात ८७% उत्तीर्णतेचा टक्का नोंदवला.
विद्यार्थ्यांनी दाखवलेली ही शैक्षणिक झेप उल्लेखनीय ठरत असून, प्रथम वर्षात वृषाली तेलगोटे हिने ७७.२०% गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे. तिच्या खांद्याला खांदा लावत रंजना जाधव (७२.८०%) द्वितीय व बरीरा अमान खान (७१.९०%) तृतीय क्रमांकाने पुढे आल्या आहेत.द्वितीय वर्षात पूजा माळी हिने ७७.३६% गुणांसह प्रथम क्रमांक मिळवून आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. तिच्यामागोमाग स्वाती गायकवाड (७६.५५%) व चेतन चव्हाण (७४.९१%) यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावत कॉलेजचा नावलौकिक वाढवला आहे.
या घवघवीत यशानंतर महाविद्यालयात आनंदाचे वातावरण आहे. प्राचार्य डॉ. सुशीलकुमार शिंदे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तर संस्थेचे अध्यक्ष व पदवीधर आमदार श्री. धीरजभाऊ लिंगाडे यांनी विद्यार्थ्यांच्या परिश्रमाचे व शिक्षकांच्या मार्गदर्शनाचे कौतुक करत, “हे यश म्हणजे बुलढाण्यातील गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे द्योतक आहे,” असे ठाम मत नोंदवले.











Total Users : 3529094