बुलढाणा (हॅलो बुलडाणा) राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत १० व ११ जुन रोजी संपुर्ण जिल्हयात विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहीमेमध्ये एकुण ३६ गुन्हयांची नोंद करण्यात आलेली असुन ३६ आरोपींसह हातभट्टी ३७१ लि. रसायन ८३५७ लि. देशी मद्य ११७.७२ लि. व विदेशी मद्य ३५.८२ लि. यासह एकुण ५ लक्ष ९८ हजार ७०५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
आयुक्त,रा.ऊ.शु.म.रा.मुंबई डॉ.राजेश देशमुख, जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील, अधीक्षक, रा.ऊ. शु. बुलढाणा डॉ. पराग नवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हात १० व ११ जुन रोजी विशेष मोहीम राबविण्यात आली.मोहिमेमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक ईश्वर नारायण वाघ निरीक्षक,राज्य उत्पादन शुल्क, बुलढाणा यांच्या नेतृत्वाखाली बुलढाणा शहरातील भीलवाडा,आंबेडकर नगर, कैकाळीपुरा या भागात अवैध हातभट्टीवर १२ वारस गुन्हे नोंदवुन १३३ लि हातभटटी व ३११४ लि रसायनासह एकुण १ लक्ष ६० हजार १७५ हजार रुपयांचा मुद्येमाल पकडण्यात आला. बोज्जावार निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भ्.प. बुलढाणा यांनी भादोला, डोंगरखंडाळा या भागात अवैध मद्य विक्री ७ वारस गुन्हे नोंदवुन १३१ लि हातभट्टी व – ३३९२ लि रसायन व ४.३२ लि देशी व सह एकुण १ लक्ष ५६ हजार २८० रुपयांचा मुद्येमाल पकडण्यात आला. व्ही एम. पाटील निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, खामगाव यांनी मनसगाव,शेगाव, देवधाबा मलकापुर या भागात अवैध हातभट्टी व मद्यविक्री ८ वारस गुन्हे नोंदवुन १०७ लि हातभटटी व १८५१ लि रसायन व ११.९७ लि देशी व सह एकुण १ लक्ष ५६ हजार ८० रुपयांचा मुद्येमाल पकडण्यात आला. रोकडे निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, चिखली व रोटे दु. नि. दे. राजा – १ व नयना देशमुख दु नि दे.राजा-२ व भगत यांनी चिखली, देउळगावराजा भागामध्ये अवैध मद्य विक्री ९ वारस गुन्हे नोंदवुन ६८.४० लि देशी व २५.९२ लि. विदेशी सह एकुण १ लक्ष २६ हजार १७० रुपयांचा मुद्देमाल पकडण्यात आला.













Total Users : 3430872