डोणगाव (हॅलो बुलडाणा/अनिल राठोड) येथील जिल्हा परिषद शाळेमधे 11 तुकड्या असून 8 वर्ग खोल्या आहेत. 3 वर्गखोल्या कमी असल्यामुळे विध्यार्थ्यांना उघड्यावर झाडाखाली बसून शिक्षण घ्यावे लागते.त्यामुळे नवीन शिक्षण सत्र सुरू होण्यापूर्वी वर्ग खोल्यांची सुव्यवस्था करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
मेहकर तालुक्यातील सर्वात मोठी डोणगाव येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेमध्ये 347 च्या जवळपास विध्यार्थी असून 11 तुकड्या आहेत. सध्या मात्र 8 तुकड्या आहेत. त्याला पाहता 3 वर्ग हे उघड्यावर झाडाखाली किंवा एकाच वर्गात दाटिवाटीने भरतात. अश्यात एका वर्षापूर्वी पालकांनी आंदोलन केल्या नंतर वर्ग खोल्या मंजूर करण्यात आल्या होत्या मात्र त्याचे काम अद्याप झाले नाही तेव्हा वर्ग खोल्या देणार नसल्याने विध्यार्थ्यांना बसायला वॉटर प्रूफ टेन्ट किंवा बुलढाणा जिल्हा परिषद मध्ये शाळा भरवण्यासाठी स्कुल बस देण्याची मागणी पालकांनी केली.
एकीकडे जिल्हा परिषद शाळेला घरघर लागलेली असतांना दुसरीकडे या शाळेत विध्यार्थी संख्या वाढत आहे मात्र या ठिकाणी असलेल्या असुविधेला पाहता 15 फेब्रुवारी 2024 रोजी पालकांनी आंदोलन केले होते. त्यावर तत्कालीन आमदार संजय रायमूलकर यांनी विधानसभेत तारांकित प्रश्न मांडला होता तेव्हा शिक्षण विभागाने लगबग करत 3 वर्ग खोल्या मंजूर केल्या होत्या मात्र पुढे त्याचे काय झाले ते कळलेच नाही.अश्यात वर्ग खोल्या नसल्याने हिवाळा व उन्हाळा या दोन ऋतूत झाडाखाली खुल्या परिसरात वर्ग भरवण्यात येतात. अश्यात पावसाळ्या मध्ये उघड्यावर झाडाखाली वर्ग भरवण्यात येऊ शकणार नाही. त्याला पाहता पावसाळ्या मध्ये खुल्या मध्ये वर्ग भरवण्यासाठी वॉटर प्रूफ टेन्ट द्यावे किंवा बुलढाणा जिल्हा परिषद मध्ये शाळा भरवण्या साठी डोणगाव ते बुलढाणा जाणे येणे करण्यासाठी स्कूल बसची व्यावस्था करण्यात यावी, यासाठी एक निवेदन शिक्षण मंत्री, शिक्षण संचालक प्राथमिक पुणे, शिक्षण उपसंचालक प्राथमिक अमरावती, जिल्हा अधिकारी, मुख्यकार्यकारी अधिकारी, शिक्षण अधिकारी प्राथमिक, गट विकास अधिकारी मेहकर व गट शिक्षण अधिकारी मेहकर यांना अवगत केल्या गेले आहे.
▪️ पालक जमीर शाह म्हणतात..
निवेदनाला प्रतिउत्तर म्हणून गटविकास अधिकारी मेहकर यांनी सांगितले की, शिक्षण विभागाला या प्रश्ना प्रती अवगत केल्या गेलेले आहे. तर शिक्षण अधिकारी प्राथमिक यांनी सांगितले की, मागणी पूर्ण केल्या जाईल. अश्यात शाळा सुरु व्हायला 12 दिवस उरलेले आहे. तेव्हा शिक्षण विभागाने पाल्याना वर्ग खोल्या किंवा उघड्यात शिक्षण घेण्यासाठी वाटरप्रूफ टेन्ट द्यावे जर तेही जमत नसेल तर बुलढाणा जिल्हा परिषद मध्ये शाळा भरवण्या साठी स्कूल बस उपलब्ध करून द्यावी,अन्यथा 23 जून रोजी शाळा प्रवेश उत्सव हा उघड्यात पावासात घेवू त्याला जवाबदार शिक्षण विभाग राहिल.