spot_img
spot_img

💥BIG BREAKING! शंभरावर अतिक्रमणधारकांनी जिल्हाकचेरी समोर मांडला संसार! – ‘घर द्या नाहीतर पर्यायी जागा द्या’ म्हणत दिला ठिय्या! – भर रात्री यंत्रणेची उडाली धांदल!

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) मोहेगाव जवळ असलेल्या माळेगाव येथील वनविभागाने 750 हेक्टरवरील अतिक्रमण हटविल्याने जवळपास शंभर ते सव्वाशे अतिक्रमणधारकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या देत घरातील सर्व साहित्य आणून रात्री 9 वाजता उघड्यावर संसार मांडला आहे. त्यामुळे यंत्रणेची धांदल उडाली मोहेगाव जवळ असलेल्या माळेगाव येथील वनविभागाने 750 हेक्टरवरील वनजमिनीवर 30 ते 35 वर्षापासून ग्रामस्थ राहत होते.आता मात्र वनविभागाने ग्रामस्थांच्या राहत्या जागेवरील अतिक्रमण हटविले आहे. त्यामुळे त्यांचा संसार उघड्यावर पडला आहे. त्यामुळे वैतागलेल्या शंभाराहून अधिक ग्रामस्थांनी चक्क येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घरातील सर्व साहित्य घेऊन उघड्यावरच संसार मांडला.

‘घर द्या नाही तर पर्यायी जागा द्या’ म्हणत ठिय्या मांडला.रात्री साडेनऊ वाजेपर्यंत येथे पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात होता.दरम्यान या ग्रामस्थांना समाज कल्याण कार्यालयाच्या ठिकाणी तात्पुरता निवारा देण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!