spot_img
spot_img

💥EXCLUSIVE! ‘बंटीदादा’ ला दाद द्यायला तयार आहात ना, बुलढाणेकर? आज बुलढाण्याच्या भूमीत अभिमानाचा सोहळा!

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) बुलढाण्याच्या मातीने अनेक दिग्गज नेते घडविले, पण हर्षवर्धन सपकाळ यांचा प्रवास वेगळा ठरतो. जिल्हा परिषद सदस्य म्हणून सुरुवात करून आमदारपद आणि त्यानंतर राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाची पदे भूषविणाऱ्या ‘दादा’ यांनी राजकारणाच्या पलीकडे जाऊन समाजसेवेचे नवे मापदंड स्थापित केले. त्यांच्या जडणघडणीत पदांपेक्षा माणूसपण अधिक ठळकपणे झळकते.

आज या भल्या माणसाचा गौरव करण्याची संधी बुलढाणेकरांना मिळत आहे! एका राष्ट्रीय पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड होणे ही बुलढाण्यासाठी अभिमानाची बाब आहे. सकारात्मक घडामोडींचे स्वागत करणे ही बुलढाणेकरांची संस्कृती, आणि याच भावनेतून  ‘बंटीदादांचा’ नागरी सत्कारासाठी आपण उपस्थित राहावे, ही मनःपूर्वक विनंती.मग या भल्या माणसाला दाद द्यायला तयार आहात ना, बुलढाणेकर?

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!