spot_img
spot_img

💥 EXCLUSIVE – केंद्रीय आयुष मंत्री जाधव यांचे हे तर पंख छाटण्याचे प्रयत्न? -आरोपांच्या वादात रविकांत तुपकरांची ठिणगी! -आम.गायकवाड यांनी ना. जाधवांवर केलेल्या आरोपांवर रविकांत तुपकर आणखी काय म्हणाले?

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी आपल्याच पक्षाचे केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव व भाजपाचे डॉ.संजय कुटे यांच्यावर नुकताच गंभीर आरोप केल्याप्रकरणात शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आणखी ठिणगी टाकली आहे.पक्ष नेतृत्वातून आमदार गायकवाड यांची खेचाखेची केली जात असावी, किंवा त्यांना त्यांचे पाय छाटण्याचा हा प्रयत्न असावा,किंवा त्यांना त्यांच्या सहकाऱ्यांना मोठे होऊ द्यायचे नसेल,असे परखड मत तुपकरांनी मांडले आहे.

विधानसभा निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे केंद्रीय आयुष मंत्री तथा खासदार प्रतापराव जाधव व भाजपचे डॉ. संजय कुटे यांनी माझे काम केले नाही,असा आरोप शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी करून राजकारणात खळबळ उडवून दिली. दरम्यान या आरोपाचे खंडन प्रतापराव जाधव यांनी केलेय. आमदार संजय गायकवाड यांच्यात जिंकण्याचा मोठा आत्मविश्वास होता.त्यांनी मुख्यमंत्र्यांची सभा देखील रद्द केली.त्यांनी केलेल्या आरोपावर मी काही उत्तर देणार नाही असे ना. जाधव यापूर्वी म्हणाले आहे. दरम्यान शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी या वादात उडी घेतली.रविकांत तुपकर म्हणाले की,संजय गायकवाड भिडस्त व्यक्ती आहे.त्यांच्यात आक्रमकपणा आहे.परंतु त्यांनी केंद्रीय आयुष मंत्री जाधव यांच्यावर जाहीर आरोप करणे गंभीर आहे.आ.गायकवाड आणि माझ्यात काही वैचारिक मतभेद असतील, परंतु मी निवडणुकी दरम्यान महाविकास आघाडी किंवा महायुती सोबत नव्हतो माझी तटस्थ अशी भूमिका होती. आ.गायकवाड यांनी ना.जाधव यांच्यावर केलेले आरोप गंभीर असून,जाधव यांच्याच पक्षनेतृत्वातून ही खेचाखेची केली जात असावी,पंख छाटण्याचे प्रयत्न होत असावे किंवा त्यांच्या सहकाऱ्यांना त्यांना मोठे होऊ नये असे वाटत असावे, असेही तुपकर म्हणाले.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!