spot_img
spot_img

💥मोठी बातमी! आमदार संजय गायकवाड यांनी मोठा भ्रष्टाचार केल्याचा आरोप! श्वेतपत्रिका प्रकाशित करा अन्यथा पर्दाफाश करणार! -माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ आणखी काय म्हणाले?

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) बुलढाणा विधानसभा मतदारसंघात गत पाच वर्षापासून झालेल्या विकास कामात मोठी अनियमितता व भ्रष्टाचार झालेला असून त्याचा पर्दाफाश केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. केवळ विकासाच्या गप्पा मारून, हवेत गोळीबार झालेला आहे. जोपर्यंत श्वेतपत्रिका प्रकाशित होत नाही तोपर्यंतमी स्वस्त बसणार नाही असं पवित्रा माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी घेतला आहे.

बुलढाणा विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्या नावे ठिकठिकाणी कोट्यावधी रुपयांचा निधी आल्याचे आणि विकास काम केल्याचे फलक लागले आहे.मात्र प्रत्यक्षात कामे झालेली नसल्याचा आरोप आहे. मंजूर विकास कामे- मंजूर निधी -खर्च झालेला निधी व ठेकेदारांचे नाव समजायला मार्ग नाही.यासाठी महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल यांना प्रत्यक्ष भेटून शेतपत्रिका प्रकाशित करण्याची मागणी सपकाळ यांनी केली होती, तेव्हा राज्यपाल महोदयांनी राज्य शासनाला श्वेतपत्रिका प्रकाशित करण्याचे निर्देश दिलेले आहेत.दरम्यान श्वेतपत्रिका प्रकाशित होत नाही तोपर्यंत केवळ विकासाच्या गप्पा मारून, हवेत गोळीबार झालेलाआहे असे सपकाळ यांचे म्हणणे असून सदर भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करणार असल्याचीही ते म्हणाले.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!