spot_img
spot_img

💥पॉलिटिक्स ! एकीकडे बंडाचा फटाका तर दुसरीकडे प्रचाराचा धूमधडाका ! -आमदार संजुभाऊ गायकवाड यांच्या प्रचारार्थ गावोगावी भव्य प्रचार रॅली!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा ) दिवाळीत विधानसभेची रणधुमाळी रंगात आली असून एकीकडे बंडाचे फटाके फुटताहेत तर दुसरीकडे प्रचाराचा नारळ फुटत आहे. माहायुतीला बंडखोरीचे ग्रहण लागले असून विजयराज शिंदे यांनी बुलढाणा विधानसभा मतदारसंघात बंडाचा फटाका फोडण्याची तयारी केली असून शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी प्रचाराचा नारळ फोडून गावोगावी प्रचाराचा धूम धडाका केला आहे.

आज ३० ऑक्टोबर २०२४ रोजी बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे अधिकृत उमेदवार सन्माननीय आमदार धर्मवीर श्री संजुभाऊ गायकवाड यांच्या प्रचारार्थ बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील ग्राम बिरसिंगपूर, अफजलपुर,उमाळा,दत्तपूर, पळसखेड नाईक, दहिद बुद्रुक येथे भव्य प्रचाररॅली काढण्यात आली.यावेळी शिवसेना,भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस तसेच घटक पक्षाचे,युवासेनेचे पदाधिकारी शिवसैनिक ग्रामस्थ माता-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!